शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

अतिक्रमण न काढता केले रस्त्याचे डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनासमोरपर्यंत (कालवा रोड)च्या रस्त्यावरील अतिक्रमण न काढता रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. परिणामी हा रोड आधीच अतिक्रमणाने व्यापलेला असताना डांबरीकरणानंतर अतिक्रमणधारकांचे चांगभल करण्याचा हा प्रकार आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.सामाजिक न्याय भवन ते राजीव गांधी चौकापर्यंतचा रस्ता तसा वर्दळीचा समजला जातो. सिमेंट रस्त्यावरून न जाता शॉटकट मार्ग म्हणूनही अनेक जण या रस्त्याला पसंती देतात. आता तर या मार्गाचे डांबरीकरण झाल्याने रहदारी अधिकच वाढली आहे. मात्र, या रोडलगत काहींनी घरांचे बांधकाम व कंपाऊंड रस्त्यापर्यंत केले आहे. आधी ही जागा नहराची असल्याने जागा मोठी होती. आता बांधकाम झाल्याने हा मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. चार दिवसांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा व नंतरच डांबरीकरणाचे बांधकाम करावे, अशा मागणीचे लेखी निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले होते. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या निवेदनात परिसरातील जवळपास ७५ कुटुंब प्रमुखांनी स्वाक्षरीसह निवेदन प्रशासनाला दिले होते. भंडारा शहरातील आताच्या राजीव गांधी चौकपासून ते नागपूर रोडपर्यंत सर्वदूर शेती होती. या शेतीला सिंचन मिळावे या हेतूने डी टेल वितरिका म्हणजेच पेंच प्रकल्पांतर्गत कालव्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर कालवा सिमेंटी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. कालव्याची रुंदी व त्याच्या एका बाजूला सर्विस रोड होते. त्यामुळे एकंदरीत कालवा व सर्विस रोड मिळून एकंदरीत रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत त्या जागेवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे.आता या मार्गावर प्रचंड रहदारी असून रस्ता अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गावर नामवंत दवाखानेसुद्धा आहेत. याशिवाय सामाजिक न्याय भवनाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळही मोठी असते. परिणामी या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता रुंद करावा, अशी मुख्य मागणी आहे. आता तर अतिक्रमण न काढताच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत.

वर्दळीचा मार्गशहरातील अनेक मार्ग वर्दळीचे आहेत. त्यापैकी राजीव गांधी चौक ते सामाजिक न्याय भवनाकडे निघणाऱ्या मार्गाचाही समावेश आहे. आता या वर्दळीचा रस्त्यावरील अतिक्रमण न काढता डांबरीकरण झाल्याने वर्दळ वाढली आहे. आधी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने नागरिक येथून रहदारी करणे टाळायचे. मात्र सद्यस्थितीत डांबरीकरण रस्त्याने जाण्यासाठी अनेक जण या रस्त्याचा उपयोग करीत आहेत.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण