शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा शिक्षकांचा संपाचा इशारा

By admin | Updated: August 9, 2014 23:33 IST

आठ अनुदानीत आश्रमशाळेतील २८० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार मागील सहा महिन्यापासून थकीत आहेत. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली

तुमसर : आठ अनुदानीत आश्रमशाळेतील २८० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार मागील सहा महिन्यापासून थकीत आहेत. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून कर्मचारी आता बेमुदत संपाच्या तयारीत आहेत.भंडारा जिल्ह्यात येरली, आंबागड, पवनारखारी, चांदपूर, कोका, माडगी (भंडारा), आदर्श आमगाव व खांबा जांभळी येथे अनुदानीत आश्रमशाळा आहेत. या शाळेत एकूण २८० शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. या संदर्भात शिक्षक संघटनेने भंडारा येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना दि. १८ जुलै, १९ जुलै व २५ जुलै ला भेटून निवेदन दिले होते. २ आॅगस्ट रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ११०० आश्रमशाळांची चौकशी १ आॅगस्ट पासून सुरु होणार होती. प्रकल्प अधिकाऱ्यांनी शिक्षक कर्मचारी संघटनेला संपावर जाऊ नका, रखडलेले वेतन आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येतील असे सांगीतले होते. सर्व शाळांची तपासणी झाल्यावर प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांनी पुन्हा घुमजाव केल्याचे संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.भंडाऱ्याचे नियमीत प्रकल्प अधिकारी सध्या दिर्घ रजेवर आहेत. त्यामुळे देवरी येथील प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांचेकडे भंडाऱ्याचा प्रभार आहे. येथे निधी असूनही वेतन रखडले आहे. जिल्ह्यातील आठही आश्रमशाळांची प्रत्येक दिवशी एका शाळेची बाल प्रकल्प विभाग नागपूर येथील ५ पथकांनी सखोल तपासणी केली.शालार्थ वेतन प्रणाली आठ ही शाळांनी नियमानुसार पूर्ण केली असून ती माहिती प्रकल्प कार्यालयाकडे देण्यात आली. प्रकल्प कार्यालयाने चुकीची माहीती जिल्हा कोषागार कार्यालयाला देण्यात आली त्यामुळे वेतन रखडल्याची माहीती संघटनेने दिली. शासनाने येथे जून्याच प्रणालीनुसार वेतन द्यावे, वेतन थांबवू नये अशा सूचना दिल्या आहेत त्या सूचनांकडे येथे दुर्लक्ष केल्या जात आहे. जिल्हा कोषागार अधिकारी अतुल गायकवाड यांचीही येथे मनमानी सुरु असल्याचा आरोप संघटना पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. येत्या आठ दिवसात रखडलेले वेतन न मिळाल्यास १५ आॅगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)