शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आशा कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:05 IST

आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांच्या स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांसाठी २८ डिसेंबरला भंडारा जिल्हा परिषदेवर संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर आयटकचे अध्यक्ष माधवराव बांते व जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. रविंद्र जगताप मुकाअ जिल्हा परिषद भंडारा यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांच्या स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांसाठी २८ डिसेंबरला भंडारा जिल्हा परिषदेवर संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर आयटकचे अध्यक्ष माधवराव बांते व जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. रविंद्र जगताप मुकाअ जिल्हा परिषद भंडारा यांना खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आशा कर्मचाºयांना सर्वाेच्च न्यायालय व केंद्रीय कामगार संघटनांच्या मागणीनुसार दरमहा १८ हजार किमान वेतन द्या, आशांना शासकीय सेवेत शामिल करा, संपकाळात केलेल्या कामाचा मोबदला द्या, प्रमोटर्सच्या कामाचा मोबदला, मानवनिदेशांक विकास कामाबद्दलचा मोबदला, रुग्णालयात व्यवस्था स्टेशनरी द्या किंवा त्याचा बिल आदी मागण्यांचा समावेश होता.सीईओ रविंद्र जगताप यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी संबंधित मागण्या त्वरीत सोडवण्याचे व शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश व आश्वासन दिले. जिल्हा परिषद समोर झालेल्या सभेत शिवकुमार गणवीर, हिवराज उके व माधवराव बांते यांनी मार्गदर्शन केले तर शिष्टमंडळात वरील पुढाऱ्यांसोबत सुनंदा दहिवले, आशिषा मेश्राम, लोभा सोनवाने, भूमिका वंजारी, मीना कुथे यांचा समावेश होता. मोर्च्यात मोठ्या संख्येत आशा कर्मचारी सहभागी होत्या.पोषण आहार कर्मचाऱ्यांचा आज आक्रोश मोर्चाशालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिवकुमार गणवीर, माधवराव बांते, हिवराज उके यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर बसस्थानक भंडारा येथून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. भंडारा जिल्ह्यातील सर्व आशा कर्मचाºयांनी वेळेवर मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक जिल्हा भंडारा तर्फे करण्यात येत आहे.