शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

आरोग्य सेवेतील महत्वाचा दुवा म्हणून राज्यातील विविध भागात आरोग्य सेवा देण्याचे काम आशा वर्कर करतात. कामानुसार तोडका मोबदला दिला जातो. मासिक मानधन मिळण्याची शास्वती नसताना राज्याची आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे.

ठळक मुद्देवरठी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा सहभाग : विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : हक्काचे वेतन व इतर मागण्यांकरिता ३ सप्टेंबरपासून आशा वर्करचे काम बंद आंदोलन सुरु आहे. शासनस्तरावर योग्य दखल न घेतल्याने वरठी येथे दोन दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचे आरडाओरड न करता मूक धरणे आंदोलने करून त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी वरठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाºया सर्व उपकेंद्राच्या आशा गटप्रवर्तक व आशा वर्कर यांनी सहभाग घेतला होता.आरोग्य सेवेतील महत्वाचा दुवा म्हणून राज्यातील विविध भागात आरोग्य सेवा देण्याचे काम आशा वर्कर करतात. कामानुसार तोडका मोबदला दिला जातो. मासिक मानधन मिळण्याची शास्वती नसताना राज्याची आरोग्यसेवा घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे.आशा वर्कर म्हणून अनेक महिलांना १० वर्षाच्या वर झालेत. दरम्यान त्यांनी अनेकदा संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी आपल्या तक्रारी मांडल्या. पण यावर तोडगा काढण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे त्रस्त आशा वर्कर संघटनेने तीन तारखेपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.आंदोलनाबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाल्याची आरोग्य मंत्री यांनी सांगितले. मात्र मागण्या संदर्भात धोरण निश्चित करण्यात हेतुपरस्पर दिरंगाई होत आहे. यामुळे १४ व १५ सप्टेंबरला वरठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.यानंतर मागण्याचे निवेदन प्राथमिक आरोग्य अधिकारी याना देण्यात आले. उपसरपंच सुमित पाटील, सामाजिक कार्यकर्ते महेश बर्वेकर, शरद वासनिक, रितेश वासनिक, सुदर्शन डोंगरे, अरुण वासनिक व भोवते यांनी आंदोलन मंडपाला भेट देऊन समर्थन दिले.आंदोलनात गटप्रवर्तक सरिता जेठे, ज्योती बावणे आशा वर्कर रचना वासनिक, शारदा फुले, मंजू रामटेके, ममता बन्सोड, रेखा वासनिक. योगिता गणवीर, शालू रामटेके, सुजाता रामटेके, अनिता सरोदे,वनिता बोरकर, निर्मला पारधी, आशा रेहपाडे, मंजुषा बालपांडे, सुळका कडव, छाया पडोळे, सुकेशनी गजभिये, सीमा डोंगरे, कल्पना मते, शांत वंजारी, शशिकला गायधने, नीलिमा भोयर, प्रेमकला धुर्वे, पुस्तकला मेश्राम, सुलोचना लोहबरे, कल्पना सव्वालाखे, मंजुषा सव्वालाखे, मंगला चन्ने, सुरेख दमाहे, देवला दमाहे, सिन्धु बांते व वनिता भोवते उपस्थित होते.