शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

इसमावर अस्वलाचा जीवघेणा हल्ला

By admin | Updated: August 10, 2014 22:48 IST

सरपण गोळा करण्यासाठी वडीलांसोबत जंगलात गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणावर दडी मारुन बसलेल्या अस्वलाने मागेहून हल्ला केला. यात अनिल नारायण राऊत (२८) हा गंभीररीत्या जखमी झाला.

करडी (पालोरा) : सरपण गोळा करण्यासाठी वडीलांसोबत जंगलात गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणावर दडी मारुन बसलेल्या अस्वलाने मागेहून हल्ला केला. यात अनिल नारायण राऊत (२८) हा गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास किसनपूर जंगल शिवारात घडली. अनिलवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अनिल राऊत हे जांभोरा टोला येथील रहिवासी आहेत. सरपण गोळा करण्यासाठी अनिल हा आपल्या वडीलांसोबत किसनपूर जंगलात गेला होता. याच वेळी अस्वलाने अचानक हल्ला केला. अनिलचे वडील नारायण हे आरडाओरड करू लागले. तोपर्यंत अस्वलाने अनिलवर वर्चस्व मिळविले होते. संघर्षानंतर अनिलला अस्वलाला पळवून लावण्यात यश आले. मात्र तोपर्यंत अनिल हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या कपाळावर, पाठीवर व पोटावर खोल जखमा झाल्या आहेत. गस्तीवर असलेले वनकर्मचारी विनायक शेंडे व शामराव धार्मिक यांनी अनिलला उपचार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.झोडे यांनी औषधोपचार केले. मात्र अनिलची स्थिती गंभीर असल्यानेत्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यातआले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, पंचायत समिती सदस्य विलास गोबाडे यांनी भेट देत याची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी मडावी, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी चोपकर, वनरक्षक बन्सोड यांनी याची माहिती उपवनसंरक्षकांना दिली. गंभीर जखमी झालेल्या अनिलला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आहे. (वार्ताहर)