शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

पालांदुरात पाण्याची कृत्रिम टंचाई

By admin | Updated: June 10, 2014 23:52 IST

लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंद नदीच्या खोऱ्यातील सर्वात लहान मोठे गाव म्हणजे पालांदूर.पालांदुरला भूमिगत पाण्याची मुबलकता असूनही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे

पालांदूर : लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंद नदीच्या खोऱ्यातील सर्वात लहान मोठे गाव म्हणजे पालांदूर.पालांदुरला भूमिगत पाण्याची मुबलकता असूनही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. शासनाने पाच दहा नव्हे सव्वा कोटी रुपये देऊनही महिलांना पाण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे.गावाच्या विकासाकरिता ग्राम पंचायत अत्यंत महत्वाची बाब आहे. स्थानिक समस्यांना तात्काळ मुक्ती मिळण्याकरिता ग्रामपंचायत प्रभावी माध्यम लोकशाहीत प्रथम आहे. गावात चौफेर विकास भेदभाव विरहित साधण् याकरिता ग्रामसभा प्रभावी साधन माध्यम आहे. गावकरी ग्रामसभेत हिरहिरीने भाग नोंदवित पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामपंचायतला महत्वाच्या सूचना दिल्या. मात्र जबाबदारीची जाणीव हरविलेल्या ग्रामपंचायतने ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखविली.पालांदूर गाव सुमारे पाच हजार लोकवस्तीचे आहे. दोन लक्ष लिटर पाण्याची साठवणूक क्षमता असलेले दोन जलकुंभ मिळणाऱ्या आठ तासाच्या विजेवर तुडूंब भरतात. प्रत्येक व्यक्तीला चाळीस लिटर पाणी याप्रमाणे प्रती कुटुंबाला ४०० लिटर पाणी मिळू शकते. मात्र पाणी वाटप यंत्रणेच्या हेकेखोर पणाने कुठे जास्त तर कुठे कमी तर कुठे थेंबही नाही अशी स्थिती पालांदूर नळयोजनेची झाली आहे.नळाला तोट्याच नाहीतपालांदूर नळयोजना एक ना अनेक कारणांनी वर्षभर गावात चर्चेत राहते. नळयोजना फसवी राहण्याकरिता नळाला तोट्याच नसणे हेही एक प्रमुख कारण आहे. नळाला तोट्या लावल्या पाहिजेत असा फर्मान ग्रामपंचायतने काढून तसा प्रयोग करणे अगत्याचे आहे. पण कृती नसल्याने नळधारकही बेडर झाली आहेत. शेजारच्या खुनारी गावात सरपंच हेमंत सेलोकर यांनी स्वत: पुढे येऊन नयाला परमनंट तोट्या लावल्या. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग टळून समान पाणी वाटपाला मदत झाली.नव्या नळयोजनेची गरज पाण्याची तीव्र टंचाईचा मुद्दा लोकमतने प्रामाणिकपणे समोर आपला प्रशासनानेही दखल घेत गावाला भेट देऊन सर्व्हे केला. अभियंता सतीश मारबते जि.प. भंडारा यांच्या अभ्यासानुसार ग्रामपंचायतने नवीन पाणी पुरवठा स्त्रोताकरिता मागणी करणे आवश्यक आहे. तहान लागण्यापूर्वी विहिर खोदणे आवश्यक आहे. आज पालांदूर गावात जर प्रामाणीक प्रयत्न झाले तर किमान पिण्याकरिता तरी पाणी मिळू शकते. मात्र याकरिता नळाला मिटर लावणे, व्हॉल्व दुरुस्त करणे, चढ उतारानुसार पाणी सोडणे, ग्रामसभेच्या सूचनांचे पालन करणे, जुन्या सव्वाकोटीचा हिशेब जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला सादर करणे, खोल खड्डे विझविणे आदी कामे केलीत तरच पालांदुरात पिण्याच्या पाण्याचे समान वाटप होऊ शकेल.ग्राम पंचायत पुढाकार का नाहीसमान पाणी वाटपाकरिता येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याकरिता ग्रामसभेचा आधार घेत कारवाई व्हायला पाहिजे. मात्र ग्रामपंचायत सदस्यांनी कर्तव्याला न जागल्याने जनतेचा रोष पत्करला आहे. काही सदस्य खड्डे बुजविण्यावर ठाम आहेत तसा ठराव सुद्धा झाला आहे. पण कही सदस्य राजकीय दबावाखाली असल्याने मागे बोलतात पण पुढे होताना दिसत नाही. पालांदूर ग्रामपंचायत सदस्यांना स्वत:च्या प्रभागातील पाणी समस्यासुद्धा अवगत नाही. प्रभागात फिरकत सुद्धा नाही. एकंदरीत समान पाणी वाटपाकरिता ग्रामपंचायत पुढाकार का घेत नाही, हा प्रश्न गाववासीयांसाठी अनुत्तरीत आहे. (वार्ताहर)