विदेशी पाहुण्यांचा संचार : थंडीतही पर्यटनस्थळावर गर्दीपवनी : कडक थंडी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे थंडीच्या प्रदेशातून हिवाळ्याच्या दिवसात विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणावर स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांसोबतच पक्षी मित्रांनाी पर्वणीच ठरणार आहे.विदर्भातील सर्वात मोठे गोसीखुर्द धरण तयार होवून त्यामध्ये मोठया प्रमाणात जलसाठा निर्माण होवून जिकडे-तिकडे चारही बाजूने अथांग पाणी पसरले आहे. त्यामुळे येथे पक्षांना वास्तव्य करणे सोईचे ठरु लागले आहे. येथे मोठ्या प्रमाणात पक्षांनी आपली घरटी बांधलेली आहेत. दोन-तीन वर्षापासून येथे थंड प्रदेश सायबेरीया, मंगेलिया, लडाख चिन आदी मधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत पक्षी येत आहेत येथे मागील दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत पक्षी आल्याचे आढळून आले आहे. मागील वर्षी येथे हिवाळ्यात स्पॉट बिल्ड डक या स्थलांतरीत पक्षांच्या थव्यासोबतच बहुसंख्य पक्षी येथे आढळून आले होते. हिवाळ्याच्या दिवसात स्थलांतरीत पक्षी येथे येण्यास सुरुवात झाली आहे.गोसीखुर्द धरण, विदर्भातील चांगले पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. दररोज येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत. हिवाळ्याच्या दिवसात येणारे स्थलांतरीत पक्षी वाढल्यास गोसीखुर्द धरण पक्षीमित्रांसाठी अभ्यासाचे ठिकाण ठरणार आहे. पण त्याकरिता या पक्ष्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणून या पक्षांना वाचविणे महत्वाचे आहे. त्यामुळे या पक्षांना येथे स्वच्छंद विहार करता येईल. त्यामुळे पुढल्या वर्षी येणाऱ्या स्थलांतरीत पक्षाच्या संख्येत वाढ होईल. धरणाच्या खालच्या निथड भागात मासेमारी केली जात असल्यामुळे या स्थलांतरीत पक्षांना जलविहार करतांना अडथळे येत आहेत. अनेक वेळा या पक्षांचे पाय जाळ्यात अडकल्याने आढळून आले आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. गोसीखुर्द धरणासोबतच वाही जलाशय वैनगंगा नदी आदी ठिकाणीही स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
गोसीखुर्द धरणात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
By admin | Updated: December 26, 2015 00:41 IST