शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 11:05 IST

तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. युरोप, आशिया, स्कॉटलँड आदी प्रदेशातून आलेल्या या पक्ष्यांमुळे जिल्ह्यातील जलाशयांचे सौंदर्य वाढले आहे.

ठळक मुद्देपक्षी निरीक्षकांना संधी युरोप, आशिया, स्कॉटलँड मधील पाहुणे पक्षी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. युरोप, आशिया, स्कॉटलँड आदी प्रदेशातून आलेल्या या पक्ष्यांमुळे जिल्ह्यातील जलाशयांचे सौंदर्य वाढले आहे. पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.भंडारा जिल्हा हा राज्यात तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दीड हजारांच्या वर जिल्ह्यात तलाव आहेत. या तलावात सध्या विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट सर्वांना मोहीत करीत आहे. साकोली तालुक्यातील अनेक तलावात गत १५ दिवसांपासून विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. त्यात राजहंस, चक्रवाक, शाही चक्रवाक, सरगम बडगा, चिखला बैस, सुंदरबटवा, खैराबाईज, शेंदऱ्याबाईज आदी विदेशी पक्ष्यांचा समावेश आहे. युरोप खंडात हिवाळ्यात थंडीमुळे जलाशय गोठतात. पक्ष्यांच्या अन्न व निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हे पक्षी समशितोष्ण कटीबंधीत प्रदेशाचा आश्रय घेतात. भंडारा जिल्ह्यातील जलाशयात या पक्ष्यांसाठी विपूल खाद्य आहेत. त्यामुळे हे पक्षी नित्यनेमाने येत आहेत.हजारो मैलांचा प्रवास करून हे पक्षी आता दाखल झाले आहेत. जलाशयात जलविहार करताना पक्ष्यांचे हे मोहक रुप अनुभवण्यासाठी पर्यटकांसह पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासनिरीक्षकांचीही गर्दी होत आहे. मात्र अलिकडच्या काळात या पक्ष्यांच्या शिकारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या पक्ष्यांचे जतन होण्याची गरज आहे.जिल्ह्यात दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशी पक्षी येतात. यंदाही जिल्ह्यातील तलावांवर या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. गत काही वर्षात शिकारीच्या घटनात वाढ झाली आहे. शासकीय स्तरावरही यासाठी कोणत्याच उपाययोजना होत नाही.-विनोद भोवते, पक्षी निरीक्षक, साकोली.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य