भंडारा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेले आंबेडकर भवन, दादर, मुंबई हे चळवळीचे केंद्र रत्नाकर गायकवाड यांनी व त्यांच्या विश्वस्त असलेल्या सहकाऱ्यांनी पाडल्याबाबत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा, भारतीय रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया व समता सैनिक दल तालुका पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आंबेडकर भवनमध्ये बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस होते त्या प्रेसमधून बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्धभारत हे प्रशिक्षक व साप्ताहिक प्रकाशित केले. आंबेडकर भवनमध्ये भारतीय बौद्ध महासभा, भारतीय रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, समता सैनिक दल यांचे केंद्रीय कार्यालय होते. आंबेडकर भवन बौद्धांचे क्रांतीस्थळ, उर्जास्थळ, परिवर्तनस्थळ, राष्ट्रनिर्मितीस्थळ होते. सामाजिक, सांस्कृतिक राजकीय चळवळीचे साक्षीदार आंबेडकर भवन होते. बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस जागतिक किर्तीचे आहे. आंबेडकर चळवळीचे साहित्यीक चळवळीचे दस्ताऐवज नष्ट केले. आंबेडकर भवन बुलडोजर लावून पाडल्याचे षडयंत्र रत्नाकर गायकवाड यांनी केले. रत्नाकर गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करावे व कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी निवेदनातून केली आहे. तसेच या घटनेचा त्यांनी कडक शब्दात निषेध व्यक्त केला. निवेदन देणाऱ्यामध्ये यशवंत सिंपोलकर, प्रभाकर मेश्राम, अजय रामटेके, शामराव राऊत, रामकृष्ण बनकर यांचा समावेश आहे.( प्रतिनिधी)
आंबेडकर भवन पाडल्याबद्दल गायकवाड यांना अटक करा
By admin | Updated: September 13, 2016 00:33 IST