शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसह संगोपणाचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:15 IST

३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या .

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : भंडारा व पवनी तालुका स्थायी समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या .भंडारा व पवनी तालुका स्थायी समितीच्या सभेत ते बोलत होते. या सभेला सहायक वनसरंक्षक आर. डी. चोपकर, तहसिलदार, अक्षय पोयाम, भंडाराच्या गटविकास अधिकारी नुतन सावंत, पवनीचे गटविकास अधिकारी तेलंग, भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे, पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, पवनीचे सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. धोटे, भंडारा सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा चव्हाण, तसेच अशासकीय संस्था प्रतिनिधींमध्ये शाहीद खान, पंकज देशमुख व इतर प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.वृक्षलागवड व संगोपण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असावा, यासंदर्भात शासन निर्णय ४ जुन २०१९ ला जारी करण्यात आला. त्यानुषंगाने भंडारा व पवनी तालुकास्तरावर आमदार रामचंद्र अवसरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती नेमण्यात आली. सदर समिती वृक्ष लागवड व संगोपण कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रशासकीय विभागांना दिलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करणे, वृक्ष लागवडीची लॅड बॅक तयार करणे, उंच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, शासनाने ठरविलेल्या कालमर्यादेनुसार खड्डे तयार करणे, झाडांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के राहण्यासाठी उपाययोजना करणे आदींसाठी कार्य करणार आहे. त्यानुषंगाने समितीची सभा १३ जुनला पंचायत समिती सभागृह, भंडारा येथे घेण्यात आली.वातावरण, ऋतू आणि हवामान बदल यांची तीव्रता आणि दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत हरित महाराष्ट्र प्रकल्पांची अंमलबजाणी सन २०१६ पासून संपूर्ण राज्यात सुरु आहे. राज्यातील जैवविविधतेचे सरंक्षण, संवर्धनाबरोबरच पर्यावरणाची सुरक्षितता राखण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनपरिक्षेत्र व वृक्षाच्छादन असणे गरजेचे आहे. राज्याचे वनपरिक्षेत्र आणि वृक्ष आवरण सध्याच्या २० टक्केवरुन ३३ टक्केवर नेण्यासाठी वृक्षलागवड आणि संगोपन कार्यक्रम सातत्यपुर्ण रितीने राबविणे गरजेचे आहे.सन २०१९ च्या पावसाळ्यातील ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्याकरीता ५३.९९ लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवून विभाग देण्यात आले आहे. याकरीता वनविभाग सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, इतर विभाग तसेच ग्रापंचायतींचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग आहे. वृक्षलागवड सोबतच त्यांचे संगोपण करण्याकरीता सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सदर