शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

भंडाऱ्यात पाण्यासाठी आक्रोश मोर्चाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:21 IST

शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यासंदर्भात नगर सेवक नितीन धकाते यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. सोमवारपर्यंत समस्येवर योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर २६ सप्टेंबरला नगरपरिषदेवर प्रभागातील महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक धकाते यांनी दिला आहे.

ठळक मुद्देपालिकेचा कारभार : प्रभाग क्रमांक १४ मधील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यासंदर्भात नगर सेवक नितीन धकाते यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. सोमवारपर्यंत समस्येवर योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर २६ सप्टेंबरला नगरपरिषदेवर प्रभागातील महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नगरसेवक धकाते यांनी दिला आहे.बारमाही वाहणाºया वैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या भंडारा शहरात पाण्याची समस्या आहे असे सांगितल्यास कोणालाही आश्चर्य वाटेल. हे येथील नगर परिषद प्रशासनाने खरे करुन दाखविले आहे. पावसाचे दिवस असल्याने तसेच गोसे धरणात पाणी अडविल्यामुळे नदी तुडुंब भरून वाहत आहेत. परंतु नगर परिषदेचे ढिसाळ कारभाराने शहरातील अनेक वॉर्डात उन्हाळ्यात जाणवेल अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कुलरचा वापर होते त्यामुळे पाण्याचा वापरही कित्येक पटीने वाढतो. त्यामुळे नगर प्रशासन पाणी वाटप करण्यात कमी पडतो. परंतु पावसाचे दिवस त्यातच नदी तुडुंब भरलेली हे अतिशोक्ती ठरेल.प्रभाग १४ मध्ये हाताबोटावर आणून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ते खाजगी नळ घेऊ शकत नाही. या वॉर्डात सार्वजनिक नळ हे बोटावर मोजण्या इतके आहेत. येथील अनेक नळावर दुगंर्धीयुक्त पाणी वाहत असते. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे. नगर प्रशासनाकडून केवळ १० ते १५ मिनिट पाणी सोडण्यात येते त्यातच नळांना येणाºया पाणीच्या धार कमी असते. कुणाला २ गुंड तर कुणाला थेंबभरही पाणी मिळत नाही.अश्या अनेक समस्या लक्षात घेऊन प्रभागाचे नगर सेवक नितीन धकाते यांनी नगर परिषद प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.नवीन पाणीपुरवठा योजनेला अंतिम स्वरूपात येण्यासाठी अजून बराच वेड बाकी आहे तो पर्यंत लोकांना बिना पाण्यानी ठेवणार काय? असा सवाल नितीन धकाते यांनी प्रशासनाला विचारला आहे. जनतेला कुठलाही त्रास होऊ देणार नाही आणि त्या साठी जर सोमवार पर्यंत या प्रश्नावर उपाय करण्यात आले नाही तर बुधवारला प्रभागातील महिलांचा आक्रोश मोर्चा नगर परिषद प्रशासना विरुद्ध काढला जाईल असे नगरसेवक नितीन धकाते यांनी सांगितले आहे.