शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुरात ५१ हजार धानाची पोती गेली वाहून; लाखोंचे नुकसान, पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 16:00 IST

तुमसर तालुक्यातील घटना; भिजलेले चार हजार कट्टे झाले खराब

माेहन भोयर

तुमसर (भंडारा) : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा फटका तालुक्यातील पिपरा येथे आधारभूत धान खरेदी केंद्राला बसला असून, पुराच्या पाण्यात ५१ हजार क्विंटल धान पोती वाहून गेल्याचे पुढे आले आहे. चार हजार कट्टे धान पाण्यात भिजून ओले झाल्याने खराब झाले आहे.

तालुक्यातील पिपरा गावाशेजारी मोठा नाला आहे. या नाल्याशेजारी संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे आधारभूत धान खरेदी केंद्र आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान या केंद्रात ठेवण्यात आला होता. मात्र, या नाल्याला गत आठवड्यात पूर आला. रात्रीच्या सुमारास सुमारे ५१ हजार धानाची पोती पुरात वाहून गेली, तर उर्वरित सुमारे चार हजार पोती पाण्यात भिजून खराब झाली आहेत, असे ग्राम अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात नमूद केले आहे.

लाखोंचे नुकसान, भरपाईचे काय?

पूर उलटून एक आठवडा झाला तरी आजही विदारक वास्तव पिपरा येथे दिसत आहे. पुरामुळे धान खरेदी केंद्र संचालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. धान खरेदी केंद्र संचालकांवर आभाळ कोसळले आहे. धान वाहून गेल्यामुळे त्याची नुकसानभरपाई मिळेल काय, या चिंतेत आहेत. तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी संस्थाचालक नितीन भोंडेकर यांनी केली आहे.

टॅग्स :floodपूरbhandara-acभंडाराagricultureशेती