शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

घरकुलासाठी अर्जुनची आर्त हाक

By admin | Updated: May 27, 2014 00:36 IST

बोरी (पांजरा) येथील अत्यंत गरीब, विधुर अर्जुन गोस्वामी (६0) घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. राजकारण्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकदा त्याच्या अज्ञानाचा फायदा उचलला.

करडी पालोरा : बोरी (पांजरा) येथील अत्यंत गरीब, विधुर अर्जुन गोस्वामी (६0) घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे. राजकारण्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अनेकदा त्याच्या अज्ञानाचा फायदा उचलला. प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या अर्जुनला तुझे घरकूल मंजूर करुन देतो म्हणून ५000 रुपये मागितले गेले. घरही पकहायला सांगितले. दोन वर्षापासून तो ऊन, पावसाचा मारा सहन करीत असतानाही त्याचे घरकुलाचे स्वप्न हवेत आहेप्रशासनाकडून फसवणूक : साहेब, केव्हा मिळणार हो गरिबाला घरकूल.

 

बोरी (पांजरा) येथील अर्जुन हरनामगीर गोस्वामी ठरला आहे. त्याच्या प्रमाणेच बोरी गावातील आणखी काहींना फसविण्यात आले. मात्र राजकारण्यांच्या दबावापोटी ते बोलायला तयार नाहीत. पालोरा, खडकी व डोंगरदेव आदी गावातून या अगोदर त्याच राजकारण्यांकडून घरकुलाच्या नावावर फसवणूक झाली.

 

मोलमजुरीचे कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालविणार्‍या अर्जुनचे मध्यंतरी कंबरेची हाडे मोडली. त्याला उठता येत नाही. अन् बसताही येत नाही.

घरी फक्त अर्धा एकर शेती आहे. पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झाले. मोठय़ा मुलीेचे लग्न झाले.लहान मुलगा त्याची सेवाश्रुषा करीत आहे. मात्र कंबरेचे हाड मोडल्याने त्याचे मोलमजुरीचे काम बंद पडल्याने दैनंदिन खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न त्यांचेसमोर उभा ठाकला आहे. पडक्या घरात मोडक्या खाटेवर झोपून तो मरणाच्या प्रतिक्षेत जीवन जगत आहे. घरकुलाचे स्वप्न त्याच्या मरणासोबतच जाणार काय? जीवंतपणी त्याला त्याचे हक्काचे घर मिळणार काय? आदी प्रश्न अनुत्तरीत आहेत. (वार्ताहर)

 मजबूर घरकुल लाभार्थ्यांकडून त्यांच्या अडाणीपणाचा फायदा उचलीत पैसे उकळून त्याने आपले पांढरे कपडे शिवून घेतले आहेत. समाजकारणाच्या नावावर राजकारणाची पोळी शेकणार्‍या पांढर्‍या रंगावरील काळे डाग अधिक गडद झाले ते बोरी येथील अर्जून गोस्वामी यांच्या प्रकरणामुळे. अधिकारी व राजकारणी लोकांच्या जनसंपर्क अभियानात सर्वांसमोर व स्वत: त्या राजकारणाच्या समोर त्याचे नाव घेतले गेले. फसवणूक करीत लुबाडणूक केल्याचे सांगितले गेले असताना भगव्या रंगाचा संरक्षक आहे म्हणून त्याच्या पक्षाच्या राजकारण्यांनी अर्जुनचा आवाज दाबून टाकला. त्याला अनेकदा बोलू दिले गेले नाही. माईक देणे सोडा सभेत उपस्थित राहण्यासही मनाई केली गेली. हाकलून लावले गेले

.