शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पापेक्षा बफर, संवेदनशील क्षेत्र मोठे ?

By admin | Updated: December 25, 2015 01:35 IST

भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्य नवीन नागझिरा (उमरझरी वनविभाग) अभयारण्य व गोंदिया जिल्ह्यातील जुने नागझिरा तसेच जुने नवेगाव राष्ट्रीय उद्यान ....

गावासभोवती जंगल नसतानाही समावेश : पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेशभंडारा : भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्य नवीन नागझिरा (उमरझरी वनविभाग) अभयारण्य व गोंदिया जिल्ह्यातील जुने नागझिरा तसेच जुने नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव अभयारण्य ही सर्व अभयारण्ये एकत्र करून राज्य शासनाने डिसेंबर २०१३ रोजी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र हा व्याघ्र प्रकल्प जाहीर केला. या व्याघ्र राखीव क्षेत्रासभोवती बफर क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली. या बफर क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या गावांचे या क्षेत्रात समाविष्ट करून घेण्यासंबंधीचे सहमती पत्र घेण्याचे काम स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.बफर क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीने १० मार्च २०१५ रोजी अहवाल सादर केला. या अहवालानुसार नागझिरा, नवीन नागझिरा व नवेगावबांध या संपूर्ण क्षेत्राला समाविष्ट करणारा अभयारण्य तयार करून नागझिरा व नवेगाव या दोन्ही अभयारण्याला बफर तसेच पर्यावरण संवेदनशील क्षेत्राने जोडले आहे.विशेष म्हणजे नागझिरा अभयारण्याची सीमा व राष्ट्रीय उद्यान नवेगाव अभयारण्याच्या सीमेमधून राष्ट्रीय महामार्ग सहा जातो. यात अनेक मोठी गावे येतात. यातील अनेक गावामध्ये जंगलही नाही. परंतु तज्ज्ञ समितीतील पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संघटनेच्या प्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून असा आराखडा तयार करावा लागला.नागझिरा, नवेगाव व्याघ्र प्रकल्पासाठी एकूण १,२१,४८५.५९५ हेक्टर वर्गक्षेत्र बफर क्षेत्र म्हणून ठरविले आहे. त्यात एकूण ६२,०३४.३५५ हेक्टर वर्ग एवढे वनक्षेत्र आहे. एकूण ५९,४५१.२४० हेक्टर वर्ग एवढे वनेत्तर क्षेत्र आहे. या संपूर्ण क्षेत्रात भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील अनेक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील एकूण १८४ गावांचा समावेश आहे.याचप्रमाणे नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर बफर क्षेत्रापेक्षा विस्तारीत असे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रही प्रस्तावित करण्यात आले आहे. यात एकूण १,१४,४७९.३४० वर्ग हेक्टर ऐवढे वन क्षेत्र प्रस्तावित असून एकूण ४६,७३२.६९२ वर्ग हेक्टर एवढे वनेत्तर क्षेत्र प्रस्तावित आहे. यात एकूण २२२ गावांचा समावेश आहे. पूर्व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा मात्र ६५,६३६.४८ एवढीच आहे. बफर क्षेत्र व पर्यावरण क्षेत्र यात येणाऱ्या गावाकडून या क्षेत्रात समाविष्ट होण्यासाठी तयार असल्याचे सहमतीपत्र वन विभागाकडून घेण्यात आले. अनेक गावातील ग्रामसभेत याबद्दल माहिती देण्यात आली नाही अनेक ठिकाणी सहमती पत्रे भरून घेण्यात आली. बफर व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट झाल्यामुळे या संपूर्ण क्षेत्रावर अनेक बंधने येणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)