शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

मुख्यालयाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार चाप

By admin | Updated: February 9, 2015 23:06 IST

मुख्यालयात बोगस वास्तव्य दाखवून कर्मचारी शासकीय घरभाडे भत्त्याची चोरी करीत आहेत. यात घरमालक सहकार्य करीत असल्याने सिंदपुरी ग्रामपंचायतमध्ये ही चोरी थांबविण्यासाठी

रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा) मुख्यालयात बोगस वास्तव्य दाखवून कर्मचारी शासकीय घरभाडे भत्त्याची चोरी करीत आहेत. यात घरमालक सहकार्य करीत असल्याने सिंदपुरी ग्रामपंचायतमध्ये ही चोरी थांबविण्यासाठी ठराव पारीत करण्यात आला आहे. अशाप्रकारे ठराव घेणारी सिंदपुरी ग्रामपंचायत जिल्ह्यातील पाहिली ग्रामपंचयत ठरली आहे. ग्रामसभेत यासंदर्भात गावकऱ्यांनी निर्णय घेत गावात कार्यरत कर्मचाऱ्यांनी गावातच वास्तव्य करण्याचा ठराव पारित केला आहे. शासकीय कर्मचारी गावात अर्थात मुख्यालयी वास्तव्य न करता बाहेरगावाहून येतात. गावातील काही घरमालकांना आमिषाचा आधार घेत, हमीपत्र गोळा करीत आहेत. शासनाचे घरभाडे भत्त्याची उचल करण्यासाठी बोगस दस्तऐवजाचा आधार घेऊन निधी लाटतात. सामान्य नागरिकाने चोरी केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येते. परंतु कर्मचारी शिक्षित असतानासुद्धा शासकीय निधीचा खुलेआम अपव्यय होत आहे. यात घरमालक सहकार्य करीत आहेत. यामुळे कर्मचारी आणि घर मालकावर फौजदारी कारवाईकरिता पुढाकार घेण्यात येणार आहे. या आशयाचा ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला आहे. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात ४७ गावे आहेत. या परिसरात शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग, कृषी विभाग, वीज वितरण कंपनी कार्यालय, पोलीस ठाणे, बँक तथा अन्य विभागाचे कार्यालय आहेत. या विभागाच्या सर्व कार्यालयात अंदाजे ६३० कर्मचारी कार्यरत आहेत. बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी मुख्यालयात वास्तव्य करीत आहे. बहुतांश कर्मचारी गावात वास्तव्य करीत नसून सिहोरा, तुमसर आणि भंडारा या शहरात वास्तव्य करून अपडाऊन करीत आहे. हे कर्मचारी महिन्याकाठी १५०० रूपये घरभाडे भत्ता घेत आहेत. यामुळे महिन्याकाठी अंदाजे ९ लक्ष ४५ हजार रूपयाची उचल करण्यात येत आहेत. वर्षाला १ कोटी १३ लक्ष ४० हजार रूपयाला चुना लावण्यात येत आहेत. मुख्यालयात वास्तव्य करण्याचे कर्मचाऱ्यांना अनेक फर्माण देण्यात आले आहेत. परंतु खुद्द अधिकारी या आदेशाचे पालन करीत नसल्याने अधिनस्थ कर्मचारी ऐकत नाहीत. बोगस वास्तव्य दाखवून शासकीय तिजोरीची लुट करणारा आकडा चक्रावून सोडणारा आहे. या कर्मचाऱ्यावर कारवाईची धडक मोहिम आजवर राबविण्यात आली नाही. दरम्यान शासकीय कार्यालयात साहित्य चोरी झाल्यास पोलीस प्रशासन चोराला पिंजून काढत आहेत. परंतू मुख्यालयात वास्तव्य न करता कर्मचाऱ्यांना अभय मिळत आहे.