शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडी-कटंगी रेल्वेमार्ग विस्तारीकरणाला मंजुरी

By admin | Updated: April 6, 2017 00:19 IST

तुमसर - तिरोडी कटंगी रेल्वे मार्ग विस्तारीकरणाला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली असून यासाठी ६६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

६६ कोटींचा निधी मंजूर : मध्य भारताला जोडणारा नागपूर-जबलपूर रेल्वे मार्गमोहन भोयर तुमसर तुमसर - तिरोडी कटंगी रेल्वे मार्ग विस्तारीकरणाला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली असून यासाठी ६६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मध्यभारतात नागपूर व्हाया तुमसर-जबलपूर येथे कमी वेळेत जाणारा हा रेल्वे मार्ग ठरणार आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात मॅग्नीज वाहतुकीसाठी तुमसर रोड ते तिरोडी हा रेल्वे मार्ग होता. प्रारंभी या मार्गावर दिवसातून एकच प्रवाशी रेल्वे धावत होती. आता तुमसर रोड - तिरोडी पर्यंत रेल्वे ट्रॅक आहे. तर तिरोडी ते कटंगीदरम्यान १२ कि.मी. पर्यंत रेल्वे ट्रॅक नाही. कटंगी ते बालाघाट तथा बालाघाट ते जबलपूर असा रेल्वे ट्रॅक आहे. केवळ १२ कि.मी. चा रेल्वे ट्रॅकअभावी जबलपूर येथे जाता येत नव्हते. तिरोडी कटंगीपर्यंत रेल्वे ट्रॅक पूर्णत्वास आल्यावर नागपूर-जबलपूर असा रेल्वे प्रवास करता येणार आहे.यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन प्रथम टप्प्यात ६६ कोटींचा निधी देण्यात आला. या कामांची निविदा काढण्यात आली आहे. मध्यभारतात स्वस्त व कमी वेळेत जाण्याचा हा एकमेव मार्ग ठरणार आहे. रेल्वे अपघाताप्रसंगी गाड्या रद्द करण्यात येतात. प्रवाशी रेल्वे व्हाया इटारसी मार्गे धावतात. यासाठी सहा तास जास्त लागत होते. अशावेळी जबलपूर - नागपूर रेल्वे मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. मागील काही वर्षापासून या रेल्वे मार्ग विस्तारीकरणाची मागणी होती. या रेल्वे मार्गासाठी खा.प्रफुल पटेल, खा.नाना पटोले यांनी प्रयत्न केले, हे विशेष.