शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर-मोहाडी प्रशासकीय इमारतीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:07 IST

एकाच इमारतीत तालुक्यातील सर्वच मुख्य कार्यालये राहावीत आणि प्रशासकीय कामांना गती मिळावी, यासाठी तुमसर आणि मोहाडी या तालुकास्तरावर प्रत्येकी १४ कोटी रूपयांची प्रशासकीय इमारत आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकारने होत आहे.

ठळक मुद्दे१४ कोटींची इमारत होणार : चरण वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकाच इमारतीत तालुक्यातील सर्वच मुख्य कार्यालये राहावीत आणि प्रशासकीय कामांना गती मिळावी, यासाठी तुमसर आणि मोहाडी या तालुकास्तरावर प्रत्येकी १४ कोटी रूपयांची प्रशासकीय इमारत आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकारने होत आहे. या ईमारतीला राज्य शासनाने मंजुरी दिली असून अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यात राज्य शासनाची अनेक कार्यालये भाड्याच्या इमारतीत आहेत. प्रशासकीय कामांकरिता अधिकारी व नागरिकांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जाण्यासाठी त्यांचा वेळ व श्रम जाते. अधिकाºयांनासुद्धा एका कार्यालयातून दुसºया कार्यालयात जाताना त्रास सहन करावा लागतो.तुमसर व मोहाडी येथे तहसील कार्यालय परिसरात प्रशासकीय इमारत बांधण्याची मागणी आ.चरण वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रशासकीय इमारतीकरीता प्रत्येकी १४ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. पोलीस विभाग वगळता सर्वच कार्यालये या प्रशासकीय इमारतीत स्थानांतरीत होणार आहेत.या प्रशासकीय ईमारतीत कृषी विभाग, पंचायत समितीचे कार्यालये, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, वीज वितरण कार्यालय, वनविभाग कार्यालय, जलसंपाद विभागासह अन्य कार्यालयांचा त्यात समावेश राहणार आहे.२०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रशासकीय इमारतीला निधी मंजूर करण्याची प्रक्रिया पुर्णत्वास आली असून बांधकामाची निविदा लवकरच काढण्यात येत आहे. येत्या वर्षभरात ही प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. ही इमारत बांधकामामुळे राज्य शासनाचे भाड्यापोटी कोट्यवधी रूपयांची बचत होणार असून अधिकारी व नागरिकांना सुविधा होणार आहे.विकासकामांना गती, नियोजन, अधिकाºयांचे समन्वय व नागरिकांची कामे तातडीने होऊन वेळ व श्रमाची बचत होईल. मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून तुमसर व मोहाडी तालुका मुख्यालयी प्रशासकीय इमारतीला मंजुरी दिली असून कामे लवकरच सुरू होणार आहेत.-आ. चरण वाघमारे, तुमसर.