शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नळ पाणी पुरवठ्याच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 00:24 IST

साकोली तालुक्यातील बंद असलेल्या घानोड आणि साकोली - लाखनी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनरूज्जीवित करण्याला शासनाने मान्यता दिली आहे.

राजेश काशिवार यांच्या प्रयत्नाला यश : घानोड व साकोली - लाखनी पाणी पुरवठा योजनालोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोली तालुक्यातील बंद असलेल्या घानोड आणि साकोली - लाखनी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनरूज्जीवित करण्याला शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी आमदार राजेश काशिवार यांनी सतत पाठपुरावा केला. आमदार राजेश काशीवार यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून अखेर ुपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे शासन निर्णयानुसार साकोली तालुक्यातील साकोली - लाखनी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ९१.४३ लाख रूपये किमतीच्या व शासन निर्णय क्र. मुपेयो २०१७/प्र.क्र.९०/पापु १९, दि. १ जून २०१७ अन्वये साकोली तालुक्यातील घानोड प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी १७.०९ लाख रूपये किमतीच्या पुनरूज्जीवन करण्याच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.राज्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व ग्रामीण जनतेस स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सद्यस्थितीत बंद असलेल्या पाणी पुरवठा योजनांना पुनरुज्जीवित करणे गरजेचे होते. यासाठी आमदार बाळा काशीवार यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर आणि प्रधान सचिव यांच्याशी वारंवार चर्चा व पत्रव्यवहार करून हा निधी खेचून आणला.त्यामुळे साकोली - लाखनी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमुळे साकोली तालुक्यातील शिवणीबांध, सावरबंध, जांभळी (सडक), खांबाळा, पिंडकेपार या पाच गावांना आणि लाखनी तालुक्यातील गोंडसावरी, सावरी, लाखोरी, पोहरा, पिंपळगाव, मानेगाव, सोबमलवाडा, रेंगेपार (कोठा) या आठ गावांना लाभ मिळणार आहे. तसेच घानोड प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमुळे साकोली तालुक्यातील घानोड, बांपेवाडा या दोन गावांना याचा लाभ मिळणार आहे.या योजनांमुळे साकोली लाखनी तालुक्यातील एकुण १५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यावर्षी ही योजना मंजूर झाली असून पुढील वर्षी परिसरातील गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही, असा विश्वास आमदार काशिवार यांनी व्यक्त केला आहे. मागील अनेक वर्षांपासूनची यासाठी मागणी होती. शासनाने यासाठी मंजूरी देऊन निधी दिल्याने परिसरात पेयजलक्रांती होणार आहे.