शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहा कोटींच्या १६ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा ...

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची सभा गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपवनसंरक्षक एस. एस. भलावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघमित्रा कोल्हे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विजय देशमुख, वरिष्ठ भु वैज्ञानिक शिवाजी पदमने, उपअभियंता यांत्रिकी नितीन पाटील, उपअभियंता दिनेश देवगडे, सहायक भु वैज्ञानिक व्ही. एम. मंत्री, जीवन प्राधिकारणाचे उपअभियंता डी. यू. तुरकर उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक नळ जोडणी व नळ पाणी पुरवठा योजनेच्या १५ लाखांवरील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे अधिकार शासनाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीस दिले आहेत त्याअनुषंगाने मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर यांनी नवीन योजना व सुधारणात्मक योजना अशा सहा कोटी पाच हजार रुपये किमतीच्या १६ योजनांना मान्यता दिली होती. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या जनजागृती पोस्टरचे या बैठकीत प्रकाशन करण्यात आले.

बाॅक्स

या गावांत होणार योजना

भंडारा तालुक्यातील सालेहेटी २४ लाख ९८ हजार, सीतेपर २३ लाख ९८ हजार, लाखनी तालुक्यातील गोंदी २४ लाख २१ हजार, सानगाव १५ लाख ६५ हजार, सायगाव १६ लाख ८३ हजार, पवनी तालुक्यातील चन्नेवाडा २७ लाख ३० हजार, खैरी २६ लाख ८८ हजार, सुरेबोडी २० लाख ८९ हजार, कुर्झा २४ लाख ९८, लाखांदूर तालुक्यातील आसोला ६६ लाख ९ हजार, विरली बु. ६१लाख ७० हजार, मोहाडी तालुक्यातील खडकी ८७ लाख ६६ हजार, पांजरा बोथली ४१ लाख ७६ हजार, विहिरगाव ४६ लाख १२ हजार व तुमसर तालुक्यातील मेहेगाव ६० लाख ५५ हजार आणि पांजरा योजना ३० लाख ४७ हजार किमतीच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

बाक्स

७६३ गावांत प्रत्येक घरी नळ जोडणी प्रस्तावित

जिल्ह्यातील ७६३ गावात प्रत्येक घारी नळ जोडणी प्रस्तावित असून ३०२ गावात योजनेची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात ५२ टक्के घरी नळ जोडणी देण्यात आली असून उर्वरित नळ तातडीने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.