शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी नगरपंचायत येथे पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST

उन्हाळ्यात अनेक वॉर्डांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, पावसाळ्यापूर्वीची कामेही अजून झालेली नाहीत. अनेक वाॅर्डांतील गटारी कचऱ्याने तुंबल्या आहेत. तसेच ...

उन्हाळ्यात अनेक वॉर्डांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, पावसाळ्यापूर्वीची कामेही अजून झालेली नाहीत. अनेक वाॅर्डांतील गटारी कचऱ्याने तुंबल्या आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापन बरोबर होत नसून अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक अर्जदारांचे घरकुलचे प्रस्ताव मंजुरीविना आहेत; तर अनेकांचे घरकुलाचे अनुदान प्राप्त झालेले नाही. विविध प्रकारच्या दाखल्यांसह, हरकत प्रमाणपत्राकरिता १०-१५ दिवसांचा कालावधी लागत आहे. कार्यालयात आलेल्या अर्जांवर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. अनेक कामे रेंगाळलेली असल्याने लाखनीच्या जनतेत असंतोष निर्माण होत आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक नसल्यामुळे येथील नगर परिषदेचे अधिकारीही सुस्तावले आहेत. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवरसुद्धा कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे लाखणी शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सन २०१४ मध्ये लाखणी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये करण्यात आले. लाखणीची एकूण लोकसंख्या पंधरा हजारांपेक्षा अधिक आहे. याशिवाय लाखनी हे तालुक्यातील सर्वांत मोठी वसाहत असलेले गाव असून तालुक्‍यातील सर्वच मोठी कार्यालये, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ लाखणी शहरात आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून लाखनी येथे विविध कार्यालये व इतर कामांकरिता शेकडो लोकांचे रोजच येणे-जाणे असल्यामुळे कोरोना रुग्णांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेच्या प्रलंबित समस्या वेळेत पूर्ण करण्याकरिता लाखणी नगरपंचायत कार्यालयात पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करावेत, असे निवेदन पालकमंत्री विश्वजित कदम व जिल्हाधिकारी संदीप कदम, भंडारा यांना तहसीलदार लाखनीमार्फत देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, लाखनी शहराध्यक्ष धनू व्यास, ज्येष्ठ नेते राजेश निंबेकर, नागेश पाटील-वाघाये, सचिन भैसारे उपस्थित होते.