शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 23:08 IST

स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा, आणेवारी जुनी पद्धत बदलून मंडळ ऐवजी गाव गृहीत धरण्यात यावे, २०१७-१८ च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या शिष्टमंडळाने सोमवारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.

नाना पटोले : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, काँगे्रसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वामीनाथन आयोग लागू करून शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा, आणेवारी जुनी पद्धत बदलून मंडळ ऐवजी गाव गृहीत धरण्यात यावे, २०१७-१८ च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या शिष्टमंडळाने सोमवारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले.महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. १७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा करून प्रत्यक्षात चार हजार कोटी रुपये माफ करण्यात आले. शेतकºयांना आॅनलाइन फार्म भरण्याची सक्ती करून प्रचंड मनस्ताप देण्यात आला. एवढे करून त्यांच्या पदरी निराशा पडली. सन २०१८ चा शेवट होत असतांनाही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा देण्यात आला नाही. शासनाने या कर्जमाफीचा फेर विचार करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने दिलेल्या सरसकट कर्जमाफी प्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना सन २०१७-१८ मधील पीक रक्कम अजून देण्यात आली नाही ती त्वरीत देण्यात यावी, सध्याची आणेवारी काढण्याची पद्धत ब्रिटिशकालीन आहे, त्यात बदल करून मंडळ ऐवजी गाव गृहीत धरणारी नवी पद्धत अमलात आणण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहेशिष्टमंडळात भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रमोद तीतीरमारे, मधुकर लीचडे, सीमा भुरे, हेमराज कापगते, प्रेम वणवे, रेखा वासनिक, के.के पंचबुद्धे, नीलकंठ कायते, राजकपूर राऊत, प्रणाली ठाकरे, शोभा बुरडे, पंकज कारेमोरे, मनोहर राऊत, प्यारेलाल वाघमारे, विकास राऊत, भाग्यश्री गिलोरकर, अमर रंगडे, मनोहर उरकुडे, नैना चांदीवर, दीपक गजभिये, सुरेखा इलमे, देवेंद्र गावंडे, गजानन झंझाड, शिशीर वंजारी, अनिक जामा, धनराज साठवणे, मुकुंद साखरकर, स्नेहल रोडगे, सचिन घनमारे, रमेश पारधी, कलाम शेख, शंकर राऊत, प्रशांत देशकर उपस्थित होते.