शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरीसाठी आॅनलाईन अर्ज करा

By admin | Updated: November 17, 2016 00:42 IST

मागेल त्याला विहिर या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात १ सिंचन विहिरीचा धडक कार्यक्रम राबविण्यात येत असून ...

जिल्हाधिकारी यांचे आवाहन : शेतकऱ्यांसाठी एक हजार सिंचन विहिरीची योजनाभंडारा : मागेल त्याला विहिर या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यात १ सिंचन विहिरीचा धडक कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंचन विहिरीच्या धडक कार्यक्रमासाठी आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची सुविधा आपले सरकार या संकेतस्थळावर १५ आॅक्टोंबर पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सिंचन विहिर योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली आहे. आपले सरकार पोर्टलवर मागेल त्याला शेततळे येथे क्लिक करुन मागेल त्याला विहिर येथे क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्या नावाची नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर सिंचन विहिरीसाठी अर्ज येथे क्लिक केल्यानंतर दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात माहिती भरावयाची आहे. अजार्सोबत आवश्यक दस्ताऐवज अपलोड करणे आवश्यक असून यासाठी २० रुपये सेवा शुल्क लागू राहील. मागेल त्याला विहिर या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी. यासाठी कमाल मयार्दा नाही. लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्टया पात्र असणे आवश्यक आहे. यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे, भातकचरा सोबत बोडी व विहिर या घटकाचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा. दोन अथवा तीन लाभार्थ्यांनी त्यांची जमीन सलग असल्यास सामुदायिक विहिरीची मागणी केली तर ते सामुदायिकरीत्या विहिर मिळण्यास पात्र असतील. यासाठी पाण्याचा वापर व पाण्याची हिस्सेवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी १०० रुपये स्टॅम्प पेपरवर करार आवश्यक आहे.शेतकरी कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे. त्याचे वारसदार, दारिद्रय रेषेखालील बीपीएल शेतकरी व इतर लाभार्थी या योजनेसाठी प्राथमिकतेनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या मागेल त्याला सिंचन विहिरी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. (नगर प्रतिनिधी)