शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेंशन योजना लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:58 IST

पाच वर्षे समाजसेवा करणाऱ्या आमदार, खासदाराना महिन्याची ४० हजार रुपये पेंशन दिली जाते. पण वयाच्या ५८ वर्षापर्यंत विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांना मात्र जुनी पेंशन योजना बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतुमसरात उपक्रम : शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पाच वर्षे समाजसेवा करणाऱ्या आमदार, खासदाराना महिन्याची ४० हजार रुपये पेंशन दिली जाते. पण वयाच्या ५८ वर्षापर्यंत विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांना मात्र जुनी पेंशन योजना बंद करण्यात आली आहे. हा दुजाभाव आहे. राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळालीच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भंडारा जिल्हा अधिवेशन तुमसर येथील लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालयात २० व २१ जानेवारीला पार पडले. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी नागपूर विभाग अध्यक्ष के.के. वाजपेयी, आमदार नागो गाणार, जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य, विभाग उपाध्यक्ष राधेश्याम पंचबुद्धे, अंगेश बेलहपाडे, सुभाष गोतमारे, भुजंगराज मेहरे, मनिषा काशिवार, दिशा गद्रे, जिल्हा उपाध्यक्ष के.डी. बोपचे, प्रदीप गोमासे, जिल्हाध्यक्ष गहूकार उपस्थित होते.शिक्षकांनी संघटित राहून पेंशनच्या लढ्यात सहकार्य करावे असे आवाहन आमदार नागो गाणार यांनी केले. नवीन शिक्षण कायदा व संच मान्यता या विषयावर विभाग अध्यक्ष के.के. वाजपेयी व जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य यांनी माहिती सांगितली. अंशदायी पेंशन योजनेवर आमदार नागो गाणार यांनी सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात आल्या.सेवानिवृत्त परिषदेचे कार्यकर्ते प्रदीप गोमासे, मिश्रा, आर.जी. निमजे व सरपंच विनोद तुमसरे यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक आर.एम. कडव, कार्यक्रमाचे संचलन सहकार्यवाह पी.एम. नाकाडे, आभार अशोक वैद्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवकराम चुटे, पांडूरंग टेंभरे, संजय गाढवे, निळकंठ कापगते, भट, पी.के. संग्रामे यांनी सहकार्य केले.