भंडारा : भारतीय मजदूर संघ जिल्हा भंडारा यांचे वतीने शुक्रवारला मोहाडी यांना ग्रामीण मजुरांच्या समस्येबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात सर्व योजनेचा लाभ नागरीकांना मिळण्याकरीता व लाभार्थी नागरिक वंचित राहू नये याकरिता सर्व योजना प्रभावी अंमलबजावणी करिता श्रमीक संघठनांना संबंधित योजनेत भागीदार बनविण्यात यावे, अत्यंत महत्वाची व आवश्यक मागणी असून शुद्ध पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. सर्व खेडेगावात शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, सर्व पंचायत समिती अंतर्गत दवाखान्यांना डॉक्टर व इतर स्टॉफ असणे आवश्यक आहे. वर्ग १२ वी पर्यंत तालुका स्तरावरच्या शाळेत व त्या अंतर्गत शाळेत नि:शुल्क व अन्य सामुग्री सहित विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावे तसेच रोजगार भिमुख शिक्षण खेड्यातून नि:शुल्क देण्यात यावे, ग्रामीण स्तरावर शेतीतून होणाऱ्या उत्पन्नाला कृषी उत्पन्न बाजार समितीतून खरेदी करण्याच्या सोई उपलब्ध व्हाव्या, संबंधित कायद्यात दुरुस्ती होऊन २०० दिवसाचे काम उपलब्ध करून देण्यात यावे, सर्व प्रकारच्या ग्रामीण मजदूरांना उदा. मनरेगा, आषाकर्मी, शेतकरी मित्र, ईटाभट्टी इ. ग्रामीण मजदूरांना किमान वेतन रु. १०००० देण्यात यावे, ग्रामीण मजदूरी करणाऱ्या कारागिरांना उत्कृष्ट सेवाच्या आधारावर किमान वेतन ठरविण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. तहसीलदार डहाट यांचे मार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले. शिष्टमंडळात भा.म. संघाचे यशवंत मोटघरे, पुरुषोत्तम राऊत, किशोर डेकाटे, रामदास मोहतुरे, अविनाश सिंदपुरे, शरद निमजे, स्वप्नील पराते, गजानन शेंडे, विनोद भोपे, राहुल गोमासे, अनिल गायधने आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
ग्रामीण मजुरांच्या समस्येचे तहसीलदारांना निवेदन
By admin | Updated: December 9, 2014 22:46 IST