कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल डोकरीमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उदापुरे, जिल्हा क्षयरोग केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य रुग्णालय भंडारा येथील कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांचे हस्ते आरोग्यविषयक चित्ररथाचे लालफित कापून हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. चित्ररथाच्या माध्यमातून तसेच ध्वनिक्षेपणाद्वारे क्षयरोगाची माहिती प्रसारित करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांना ‘वेळ निघून जात जात आहे क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्याची’ हा रोगाचा मजकूर असलेल्या फेस मास्कचे वाटप करून मुखवटा सेल्फी अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातसुद्धा मुखवटा सेल्फी अभियान चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व कला, प्रश्नमंजुषा, क्षयरोगाबाबत रोगाबाबत फलक तयार करणे, आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून समाजामध्ये शहर, गावविषयक जनजागृती करून जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शहर क्षयरोगमुक्त करणे ही संकल्पना साध्य करता येईल. शासकीय आरोग्यसेवा यंत्रणेमार्फत क्षयरोग कार्यक्रमाची नियमित अंमलबजावणी करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत भारतातून क्षयरोग उच्चाटनाचे उद्दिष्ट २०२५ मध्ये सध्या करायचे आहे. याकरिता शासकीय आरोग्य संस्थेत सोबतच खासगी व्यावसायिकांनी नोटीफिकेशन करून शासकीय आरोग्य यंत्रणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आर. एस. फारुकी तसेच जिल्हा परिषद भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी केले आहे.