शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महागाईच्या विरोधात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:20 IST

गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष उषा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला काँग्रेसची सभा शनिवार (दि.७) गोंदिया येथील भोला भवनात घेण्यात आली.

ठळक मुद्देमहिला काँग्रेसची गोंदियात सभा : उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : गोंदिया जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष उषा शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला काँग्रेसची सभा शनिवार (दि.७) गोंदिया येथील भोला भवनात घेण्यात आली. या सभेनंतर सतत वाढणाºया गॅस, पेट्रोल व डिझेल यांच्यासह जिवनावश्क वस्तूचे दर नियंत्रणात आणणाºया संघषात गोंदियाचे उपजिल्हाधिकारी महिरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना जिल्हा महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सादर केले. महागाई नियंत्रणात आणले नाहीत. या मागणीला धरुन पक्ष तिव्र आंदोलन करेल, अशा इशाराही देण्यात आला.जिल्हा महिला काँग्रेसची ही सभा जिल्हा महिला काँग्रेसची नियंत्रक बेबी गौरीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, उषा शहारे, जि.प.सदस्य, पं.स. सभापती, उपसभापती, पं.स.सदस्य, सरपंच व पक्षाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. सभेत पक्षाचे महिला संघटन, ग्रा.पं.ची निवडणूक, वाढत्या महागाई व पक्षाचा आढाव्यावर चर्चा करण्यात आली. या सभेत बेबी गौरीकर, उषा मेंढे, रोहीणी रहांगडाले, सरिता अंबुले, जि.प. सदस्य लता दोनोडे, वंदना काळे, पं.स. उपसभापती संगीता भेलावे, सभापती हेमलता डोये, माधुरी हरिणखेडे, नगरसेविका प्रज्ञा गणवीर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उषा शहारे, संचालन देवरी तालुका महिला अध्यक्ष सुषमा घरत व आभार जि.प. सदस्य सीमा मडावी यांनी मानले. निवेदन सादर करणाºया शिष्टमंडळात जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, गोंदिया पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, आमगावच्या सभापती हेमलता डोये, देवरीचे उपसभापती संगीता भेलावे, सीमा मडावी, लता दोनोडे, ज्योती वालदे, माधुरी कुंभरे, सरिता कापगते, योजना कोतवाल, छाया मेश्राम, रोहीणी रहांगडाले, सरपंच आशा खांडवाये, मीरा नाईक, नगरसेविका वंदना शहारे, वंदना जांभुळकर, उर्मिला जुमनाके, प्रज्ञा गणविर, सुषमा घरत, इंद्रानी धावडे यांचा समावेश होता.या समस्यांवर होता रोषजिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने राज्यात सतत वाढणारे घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती आणि जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमुळे सर्वसामान्य गरीब गृहणी यांना आर्थिक त्रास होत आहे. त्याकरिता वाढत्या महागाई व गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यात यावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे गोंदियाचे उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना निवेदन ददेण्यात आले.