लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात लवकरच अॅन्टीजेन टेस्ट कीट द्वारे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी तीन तपासणी केंद्र कार्यान्वित करून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक दुकानातही तपासणी केली जाईल. व्यापारी व नागरिकांनी याला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी माथूरकर, डॉ.प्रशांत उईके उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सीक्स मिनिट वॉक टेस्ट व्यापारी संघटनेला दुकानात प्रत्यक्ष तपासणी तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सुद्धा अॅन्टीजेन तपासणी करून घेण्याच् या सूचना केल्या. सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी टेस्ट करण्याच् या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्याधिकारी भूवनेश्वरी एस यांनी पल्स अॅस्कीमीटर द्वारे तपासणी करून सीक्स मिनिट वॉक टेस्ट मध्ये भाग घेतला. कोरोनाला न घाबरता प्रत्येक नागरिकांनी तपासणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर संघटनेशी चर्चा करून कोरोना प्रतिबंधात्मक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. होम क्वारंटाईनमध्ये राहण्याची व्यक्तीची इच्छा असेल तर त्यांना गृह विलगीकरणात ठेवा असे ते म्हणाले.व्यापारी संघटनेसोबत बैठकशहरातील व्यापारी संघटनेशी जिल्हाधिकाºयांनी बैठक घेतली. यावेळी नगरप्रशासन अधिकारी पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव उपस्थित होते. नियोजित अॅन्टीजेन टेस्टसाठी व्यापाºयांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्याला संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला. वाढता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व दुकाने ९ ते ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून रविवारी सर्व दुकाने सर्व बंद राहतील असे सांगितले.चार ठिकाणी तपासणी केंद्र प्रस्तावितभंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक, गांधी शाळा, राजीव गांधी चौकात गणेश विद्यालय आणि दसरा मैदानात तपासणी केंद्र कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना विचारणा करून पुढील कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. शहरातील प्रत्येक दुकानात जाऊनही तपासणी करण्यात येणार आहे.
भंडारा शहरातही होणार अॅन्टीजेन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST
नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी माथूरकर, डॉ.प्रशांत उईके उपस्थित होते.
भंडारा शहरातही होणार अॅन्टीजेन तपासणी
ठळक मुद्देसंदीप कदम : प्रत्येक दुकानात तपासणी करणार, कोविड सेंटरबाबत अफवा पसरवू नका