नगरसेवक उके प्रकरण : गुरूवारी मध्यरात्रीची कारवाईतुमसर : नगरसेवक प्रशांत उके यांच्या हत्या प्रकरणी तुमसर पोलिसांनी आणखी एकाला गुरुवारी मध्यरात्री नागपुरातून अटक केली. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे. एक आरोपी अद्याप फरार आहे. आशिष गजभिये (२६) रा. मेहगाव, हल्ली मुक्काम नागपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.१२ आॅगस्ट रोजी नगरसेवक उके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान जखमी अवस्थेत प्रशांत उके यांनी या हल्ला प्रकरणातील आरोपींची पोलिसांना नावे सांगितली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी टप्प्याटप्प्याने सहा जणांना अटक केली होती. तर गुरुवारी मध्यरात्री एक आरोपी आशिषला अटक केली. आशिष एका प्रकरणात नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याची जामिनावर सुटका होताच तुमसर पोलिसांनी त्याला अटक केली. मुख्य सूत्रधार नीलेश भोंडे रा. नागपुर याने यापूर्वी नागपुरात सराईत गुंडाची हत्या केली होती. उके यांच्या हत्येचा कट नागपुरात रचला. हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वीच आरोपींनी तुमसरात तळ ठोकला होता. उकेंवर आरोपींची करडी नजर होती. आरोपींनी सकाळची वेळ येथे निश्चित केली. तुमसर-कटंगी रस्त्यावर उके एकटेच असतात हीच वेळ हल्लेखोरांनी निश्चित करुन नगरसेवक उके यांच्यावर हल्ला केला होता. (तालुका प्रतिनिधी)
आणखी एकाला अटक
By admin | Updated: September 5, 2015 00:42 IST