शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यावसायिकांना निर्वाणीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 21:41 IST

अड्याळ पोलीस स्टेशन हद्दितील ६९ गावातील एकुण ४८ पोलीस पाटलांची तातडीची बैठक पोलीस स्टेशन अड्याळ येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात प्रत्येक पोलीस पाटलांनी नवनियुक्त ठाणेदार सुरेश ढोबळे यांनी कुठे काय होत आहे, याची माहिती घेतली. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी धंदे बंद करावे, अन्यथा दंडात्मक कार्यवाहीला तयार राहावे अशा सूचनाही देण्यात आल्या.

ठळक मुद्देएकमत : अड्याळ ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ पोलीस स्टेशन हद्दितील ६९ गावातील एकुण ४८ पोलीस पाटलांची तातडीची बैठक पोलीस स्टेशन अड्याळ येथे नुकतीच घेण्यात आली. त्यात प्रत्येक पोलीस पाटलांनी नवनियुक्त ठाणेदार सुरेश ढोबळे यांनी कुठे काय होत आहे, याची माहिती घेतली. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी धंदे बंद करावे, अन्यथा दंडात्मक कार्यवाहीला तयार राहावे अशा सूचनाही देण्यात आल्या.बैठकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी अवैध व्यवसाय सुरु ठेवण्यााठी हप्ता वसुली जर करत असेल तर अंशाची व्हिडीओ क्लीप तयार करा. त्यामुळे त्यांच्यावरही खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात येईल.पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील अवैध व्यवसाय आहेत, ते आतातरी बंद व्हावे यासाठी ही माहिती पोलीस पाटलांतर्फे संपुर्ण अवैध व्यवसायीकांना याविषयीची माहिती मिळावी म्हणून ही बैठक असल्याची चर्चा होती.नवनियुक्त पोलीस निरीक्षकांना वर्षभर सांभाळताच अमित भारत भिवगडे व रोशन अंबादास सेलोकर या दोन आरोपींना गो तस्करी करतांना रंगेहात पकडून अटक केली. एका माहितीनुसार क्र. एम एच ३६ एफ २६००६ यामध्ये ४ बैल अवैधरित्या घालुन कोंढा येथून कळमना नागपूर येथे जात होते.सदर कारवाईनंतर या चारही बैलांना सडक पिंपळगाव लाखनी येथील गोशाळेत रवानगी केल्याची माहिती पिएसआय नितीन दांडळे यांनी दिली.काही दिवसाआधी जो प्रकार अड्याळ येथून अवघ्या दोन किलोमिटर अंतरावरील सौंदड सुरबोडी पुर्नवसनात घडला. त्या पध्दतीचा प्रकार, घटना होवु नये म्हणून संपूर्ण अवैध धंदे बंदीचा फतवा तर निघाला पंरतु कार्यवाहीमुळे आता अवैध व्यवसायीकही धास्तावलेल्या स्थितीत आढळून येत आहेत.झालेल्या प्रकरणात कर्तव्यावर असूनसुध्दा हयगय केल्यामुळे अड्याळ पोलीस स्टेशन मधील १० ते ११ पोलीस कर्मचाºयांना निलंबनाचे आदेश पत्र आले आहेत. परंतु यामध्ये कुठलाही मोठा पोलीस अधिकारी मात्र निलंबित झालेला नाही. यात निलंबित झालेले सर्वच दोषी आहेत का? याचीही चर्चा होत आहे.नवनियुक्त ठाणेदार किती दिवसांसाठी आहेत कारण याच ठाणेदार सुरेश ढोबळे यांना अड्याळ पोलीस स्टेशन मधून अवघ्या तीन चार महिन्यातच बदलीचा आदेश मिळाला होता. अवैध धंदे फोफावण्यामागे लहान पोलीस कर्मचाºयांचा हात असतो, की मोठ्या पोलीस अधिकाºयांचाही हात असतो अशीही चर्चा गावातील पानपटपरीवर सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.