शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाविरोधात अंनिसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

महाराष्ट्राला संतांची आणि महान सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले आहे. आपली भूमीची ओळख बुद्धांचा देश असा उल्लेख केला जातो. ...

महाराष्ट्राला संतांची आणि महान सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले आहे. आपली भूमीची ओळख बुद्धांचा देश असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामीपासून ते थेट संत गाडगे महाराजांपर्यंत वैज्ञानिक प्रबोधनाची परंपरा आहे. दुसऱ्या बाजूला महात्मा जोतिबा फुले पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाजसुधारक होऊन गेले. त्यांची परंपरा चालू ठेवणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. अशा वेळी इग्णूतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष शास्त्र या विषयात पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. खगोलशास्त्र ज्योतिष शास्त्रला मान्यता देत नाही. ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे. स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्योतिषशास्त्राला कडाडून विरोध केला आहे. ज्योतिषशास्त्र हा अभ्यासक्रम शिकून महाराष्ट्रमध्ये कर्मकांड करणारे आणि आपला वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवणारे युवक तयार होतील. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल. हे थांबवण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्र या अभ्यासक्रमांना मान्यता देऊ नये, अशी मागणी आहे. शिष्टमंडळात ग्यानचंद जांभुळकर, रामकृष्ण ईटनकर, हितेश नथुराम गायधने, गिरीधर मोटघरे, सिराज शेख, अफरोज पठाण, आदर्श बडवाईक, अजय कडव, प्रमोद सव्वालाखे, अजय धर्मदास चौरे, यशवंत थोटे आदींचा समावेश होता.