शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाविरोधात अंनिसचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:35 IST

मोहाडी : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, मोहाडीतर्फे महाराष्ट्रात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे ज्योतिषशास्त्र हा विषय सुरू ...

मोहाडी : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, मोहाडीतर्फे महाराष्ट्रात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाद्वारे ज्योतिषशास्त्र हा विषय सुरू करू नये, या आशयाचे निवेदन तहसीलदार देविदास बोबुर्डे यांच्यामार्फत २९ जुलै २०२१ला मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आले.

निवेदनानुसार महाराष्ट्राला संतांची आणि महान सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. या भूमीबाबत बुद्धांचा देश असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामींपासून ते थेट संत गाडगे महाराजांपर्यंत वैज्ञानिक प्रबोधनाची परंपरा आहे, तर दुसर्‍या बाजुला महात्मा ज्योतिबा फुलेंपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाजसुधारक होऊन गेले. त्यांची परंपरा चालू ठेवणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य आहे. अशावेळी इग्नूतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिषशास्त्र या विषयात पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्राला मान्यता देत नाही.

ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे. स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्योतिषशास्त्राला कडाडून विरोध केला आहे. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल. हे थांबवण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्र या अभ्यासक्रमांना मान्यता देऊ नये. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा आपण पुढे चालू ठेवाल, याची खात्री आहे, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, जिल्हा संघटक वसंत लाखे, डी. जी. रंगारी, रत्नाकर तिडके, मुलचंद कुकडे यांच्या मार्गदर्शनात अंनिस शाखा मोहाडीचे ग्यानचंद जांभूळकर, रामकृष्ण इटनकर, हितेश नथुराम गायधने, गिरीधर मोटघरे, सिराज शेख, अफरोज पठाण, आदर्श अशोक बडवाईक, अजय दयाराम कडव, प्रमोद सव्वालाखे, अजय धर्मदास चौरे, यशवंत थोटे यांच्या उपस्थितीत तहसीलदार बोबुर्डे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले.