शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

‘कोडवर्ड’ने होतेय जनावरांची खरेदी विक्री

By admin | Updated: May 23, 2014 23:41 IST

विदर्भात जनावरांची खरेदी विक्री करणारे अनेक प्रसिद्ध बैल बाजार आहेत. या बाजारात जनावरांची खरेदी विक्री थेट होत नाही. जनावरांची खरेदी विक्री करताना विशेष कोडवर्ड शब्दांचा उपयोग केला जातो.

जुन्या पद्धतीची परंपरा कायम : शंभरहून अधिक शब्दांचा प्रयोग

चुल्हाड/सिहोरा : विदर्भात जनावरांची खरेदी विक्री करणारे अनेक प्रसिद्ध बैल बाजार आहेत. या बाजारात जनावरांची खरेदी विक्री थेट होत नाही. जनावरांची खरेदी विक्री करताना विशेष कोडवर्ड शब्दांचा उपयोग केला जातो. लोकमतने या कोडवर्डचा शोध सिहोरा येथील बैल बाजारात केली असता, अनेक चक्रावून सोडणारे शब्द निदर्शनास आले आहे. येत्या पुढील महिन्यात पावसाळ्याचे आगमन होणार आहे. यामुळे शेतीच्या मशागतीकरीता शेतकर्‍यांत लगबग सुरू झाली आहे. पावसाळा पुर्वी शेतकरी लागणार्‍या साहित्याची जुळवा जुळव करीत आहे. बँकांनी शेतकर्‍यांना क्राप लोन कर्ज वाटप केले आहे तर उर्वरित कर्ज वाटप सुरू आहे. एप्रिल, मे आणि जुन या तीन महिन्यात शेतकर्‍याचंी मोठी धावपळ सुरू झाली आहे. शेतीचा खरीप हंगाम पुढे असल्याने शेतकर्‍यांची कसरत होत आहे. एरवी वर्षभर बैल बाजारात जनावरांची असणारी अल्प संख्या आता झपाट्याने वाटत आहे. बैल बाजारात बैल जोडीची वाढती संख्या असल्याने शेतकरी मोठ्याने धाव घेत आहे. बैलांच्या किंमती ही वाढल्या आहेत. एरवी २० हजार विक्री होणारी बैल जोडी या तीन महिन्यात ४० हजारांच्या घरात पोहचली आहे. बैल बाजारात शेतकरी बैलांची अदला बदल ही करीत आहे. बैलांच्या बाजारात जनावरांची थेट खरेदी विक्री होत नाही. शेतकरी आपसात जनावरे अदला बदल करीत नाही. जनावरांची खरेदी विक्री करताना दलाल या घटकाचा आधार घ्यावा लागतो. बैल बाजारात जनावरांची खरेदी विक्री करताना या दलालांची महत्वाची भूमिका असतो. स्वत:हून शेतकरी कधीही बैल बाजारात जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी पुढाकार घेत नाही. शेतकरी ही या दलालांचा सहयोग घेत आहेत. विदर्भात अनेक प्रसिद्ध बैल बाजार आहेत. या बाजारात एकाच दराची बैल जोडी खरेदी विक्री होत नाही. वर्धा येथील बैल बाजार महागडा असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाजारात लक्षावधी किंमतीच्या बैल जोडी खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. हजार ते लक्षावधी किंमतीचे जनावरे खरेदी विक्री करताना बैल बाजारात थेट राशीचा उपयोग होत नाही. ही सर्व प्रक्रिया दलाल मार्फत केली जाते. जनावरांची विक्री आणि खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांचे दोन दलाल एकमेकांसोबत संवाद साधतात. या संवादात पैशाची आकडेवारीत जबानी बोलनी होत नाही. हा खरेदी विक्रीचा व्यवहार करताना दोन दलाल कोडवर्ड या शब्दाचा उपयोग करतात. हे कोडवर्ड असलेले काही शब्दाची जाण शेतकर्‍यांना असली तरी बहुतांश शब्द अडचणीचे वाटणारे ठरतात. अशा अनेक शब्दांचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने सिहोरा येथील विदर्भात प्रसिद्ध असलेल्या बैल बाजारात घेतला आहे. या बैल बाजारात दोन दलाल एका जनावरांचा सौदा खरेदी विक्री करताना विचित्र शब्दांचा वापर करीत होते. यात हिंदी, मराठी तथा इंग्रजी भाषेचा प्रभाव नव्हता. जनावरांची खरेदी विक्री करताना दलाल कोडवर्डचा आधार घेत होते. या कोडवर्ड मध्ये सिकारा, कपडा,रेकी साडे, खंबा, भिंगा कैला, राबा केला, सुती केला, तेरा पंजे, ठला, कप सुती, जोडली, टेकरी, गाफा सोलकू, बटलासा, लिंबू एकन, सत्तर आसर, सुटी ढगारा, साई जाफा हे जनावरांची किंमती तथापि आकडेवारी ठरविणारी आहेत. या शब्दाचे अर्थ आणि किंमत हे दलाला माच कळत असतो. परंतु या शब्दातून होणारे आर्थिक व्यवहार शेतकर्‍यांची लुट करणारे नाहीत, असे दिसून आले आहे. तब्बल तीन तास बैल बाजारात या शब्दाची शोधा शोध करण्यात आली आहे. दरम्यान एका दलालाची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी सांगितले. बैल बाजारात याच कोडवर्ड शब्दांनी जनावरांची खरेदी विक्री होते. नवतरूण दलाल या अनेक शब्दापासून अनभिज्ञ असले तरी, वयोवृद्ध नागरिक या शब्दांचा मोठ्याने वापर करीत आहेत. या कोडवर्ड मधून जनावरांची खरेदी विक्री करण्याची पद्धत जुनीच आहे. ही परंपरा कायम आहे. कोणत्या लीपी अंतर्गत या शब्दांचा उदय झाला, असे विचारले असता, कुणीही सांगण्यास तयार नव्हते.