शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पशु दवाखाने ‘आॅक्सिजन’वर

By admin | Updated: January 9, 2017 00:23 IST

जिल्ह्यातील बहुतांश नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह गोपालन करणे आहे. परंतु, निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे शेतकरी होरपळत असताना...

६१ पदे रिक्त : कामांचा खेळखंडोबा, गो-पालनाच्या माध्यमातून उदरनिर्वाहावर अवकळादेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यातील बहुतांश नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेतीसह गोपालन करणे आहे. परंतु, निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे शेतकरी होरपळत असताना त्यांना गोपालनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह सुरु आहे. मात्र अलिकडे जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणारे अनेक पशु दवाखाने 'आॅक्सीजन'वर असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन पशु उपआयुक्त यांच्या अखत्यारीत एकूण ८५ दवाखाने आहेत. यात ३२ दवाखाने हे जिल्हा पशुसंवर्धन पशु उपआयुक्त यांच्या अखत्यारीत तर ५३ दवाखान्यावर जिल्हा परीषद पशुसंवर्धन विभागाचे नियंत्रण आहे. या ८५ पशु दवाखान्यातील ६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषदेच्या पशु दवाखान्यासाठी १७० पदे मंजूर असून १५१ पदे कार्यरत आहेत. १९ पदे रिक्त आहेत. तर पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय भंडारा अंतर्गत ३२ दवाखाने आहेत. एक पॉलिक्लिनीक आहे. उपआयुक्त कार्यालयाच्या कामासाठी जिल्ह्यात ११९ पदांना मंजूरी असली तरी यातील ४२ पदे रिक्त आहेत. सध्यास्थितीत ७७ पदे भरलेली आहेत. जिल्ह्यातील अनेक दवाखान्यात वरिष्ठ लिपीक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व परिचरांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कामांचा खेळखंडोबा होत असून जनावरांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. सन २०१२ च्या पशुगणनेप्रमाणे जिल्ह्यात ७ लाख ७४ हजार ३४ पशुधन आहे. यात २ लाख ३८ हजार ७७४ गाय वर्ग, ९० हजार १६१ म्हैसवर्ग, १ लाख ६१ हजार ५२८ शेळ्या, २ हजार ६८४ मेंढ्या, २ लाख ७० हजार २५९ कुक्कूटवर्ग, २४९ डूकरे, २३ घोडे, १० हजार ३५६ घोड्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५१६ सहकारी दुध संस्था आहेत. यापैकी २८५ संस्था सुरु आहेत. जिल्ह्यात दोन शासकीय दुध शितकरण केंद्र आहेत. तर १० खासगी संस्थेमार्फेत दुध संकलन केल्या जाते. २१ राज्यस्तरीय दवाखाने भाड्याच्या घरातभंडारा जिल्ह्यात जिल्हा पशुसंवर्धन पशु उपआयुक्त यांच्या अखत्यारीत एकूण ३३ दवाखाने आहेत. यात १३ दवाखान्यांसाठी शासकीय इमारतीत कारभार सुरु आहे. मात्र आजही एकुण २१ पशुवैद्यकीय राज्यस्तरीय संस्थांचा कारभार भाड्याच्या घरात आहे. या २१ दावखान्यांना आजही शासकीय इमारतीची प्रतिक्षा आहे.यात बेला, खरबी, दाभा, जाम, कोका, खापा, हरदोली, मिटेवानी, चुल्हाड, गोबरवाही, देव्हाडी, विर्सी, पिंडकेपार, खुटसावरी, पोहरा, कनेरी, केसलवाडा, सेंदूरवाफा, उमरी, दिघोरी मोठी, भुयार गावांचा समावेश आहे. यातील काही दवाखान्यासाठी शासकीय इमारत व्हावी, यासाठी हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी या सात पंचायत समितीचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात या सातही तालुक्यात पशुसंवर्धन खात्यामार्फत पशुधनाला वैद्यकीय उपचार, गावठी वळूंचे खच्चीकरण, साथीच्या रोगाचा प्रसार होवू नये म्हणून रोग प्रतिबंधक लसीकरण, साथीच्या रोगाचा प्रसार झाल्यास त्यावर त्वरीत उपचार, संकरीत गौपैदास वाढविण्यासाठी कृत्रिम रेतन कार्यक्रम, कुक्कूट पालन, शेळी पालन व दुग्ध व्यवसायाकरिता शेतकऱ्यांना प्रशिक्षण, उबविण्याची अंड वाटप शेळ्याचे गट वाटप, दुधाळ जनावरांचे वाटप, संकरीत वासरांचे मेळावे, कार्यमोहीमा, प्रशिक्षण शिबिरे, सुधारित चाऱ्यांची पिके घेण्याकरिता वेरण बियाणे व रोपे वाटप, कत्तलखान्यावर नियंत्रण, पशुसंवर्धन विषयक कायद्याची अंमलबजावणी इत्यादी पशुसंवर्धन विषयक कामे करण्यात येतात.-डॉ. के. एस. कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त भंडारा