शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे जनावरांचा मृत्यू

By admin | Updated: October 29, 2016 00:40 IST

आंधळगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गायमुख रामपूर येथील बैलबाजारातून आंधळगाव-रामटेक मार्गे कामठी कत्तलखान्यात जनावरांची वाहतूक होत असते.

पत्रपरिषद: ठाणेदारासह, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करा, बजरंग दलाची मागणीमोहाडी : आंधळगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गायमुख रामपूर येथील बैलबाजारातून आंधळगाव-रामटेक मार्गे कामठी कत्तलखान्यात जनावरांची वाहतूक होत असते. आंधळगाव पोलिसांनी १५ आॅक्टोंबरला सकाळी ८.३० वाजता जनावरांनी धरलेला बोलेरो पिकअप मिनीट्रक पकडला. पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजुस आणून ठेवला. दुपारी दोन वाजेपर्यंत त्या जनावरांची काळजी घेण्यात न आल्याने ३ जनावरे मरण पावले. पशुवैद्यकीय अधिकारीही सायंकाळी ५ वाजता आली. त्यामुळे त्या जनावरांच्या मृत्युस ठाणेदार व पशुवैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी पत्रपरिषदेद्वारे बजरंगदल जिल्हा संयोजक तिलक वैद्य, विश्वहिंदू परिषदेचे अ‍ॅड. प्रशांत मिश्राम आदींनी केली आहे.रामपूर गायमुख येथे बुधवारला बैलबाजार भरवीला जातो. यासाठी जिल्हा परिषदेची परवानगी घेण्यात आलेली नाही. या बैलबाजारातून घेतलेली जनावरे आंधळगाव-रामटेक मार्गे कामठी येथील कत्तलखान्यात नेली जातात. पोलीस एकादवेळ कार्यवाही करतात. १५ आॅक्टोबरला सुद्धा बोलेरोपिकअप या मिनीट्रकला आंधळगाव पोलिसांनी सकाळी ८.३० वाजता पकडले. या मिनीट्रकमध्ये १९ जनावरे ठासून भरलेली होती. या मिनीट्रकला दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस ठाण्याच्या मागे उभा ठेवण्यात आल्याने ३ जनावरे मरण पावली. पशुवैद्यकीय अधिकारीही सायंकाळी ५ वाजता आले. या प्रकरणातील आरोपींना त्यांच्याच कारमध्ये बसवून न्यायालयात नेण्यात आले.बोलेरो पिकअप मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पकडलेल्या १६ जनावरांना गडेगाव येथील कुसुम गौशालेत पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र या गौशालेत पाठविण्यात आलेल्या जनावरांचा हिशोबच लागत नाही. त्यामुळे पोलिसांनी रेंगेपार येथील मातोश्री गौशाळेत पकडलेले जनावरे पाठवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली असून पुढेही जर अशीच गौवाहतूक सुरू राहिली तर बजरंग दलातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पत्रपरिषदेला तिलक वैद्य, अ‍ॅड. प्रशांत मिश्रा, तालुका संयोजक हर्षल जावळकर, सोनू मेहर, ज्योतिष नंदनवार, स्वप्नील तिघरे, राम कांबळे, जिबील डुंबरे, सचिन पारधी, मनिष चिंधालोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)