शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त ग्रामस्थांचा वीज अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:22 IST

वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाºयांना घेराव घातला.

ठळक मुद्देमौदी पुनर्वसन येथील घटना : मागणीच्या पूर्ततेसाठी नागरिक ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या वीज वितरण अधिकारी तथा कर्मचाºयांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही घटना बुधवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास मौदी पुनर्वसन येथे घडली. आधी मागण्यांची पुर्तता करा तेव्हाच विद्युत देयकाचा भरणा करु, या मागणीला घेवून ग्रामस्थांना वीज अधिकाऱ्यांना घेराव घातला.भंडारा जिल्ह्यातील पुनर्वसनासह प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. नागरी सुविधांचा वाणवा कायम आहे. पुनर्वसन क्षेत्रातील समस्या तात्काळ सोडविण्याचे गाजर शासन प्रशासन दाखवित आल्याने ग्रामस्थांचाही संयम सुटत आहे. मौदी पुनर्वसनात अशाच नागरी सुविधांचा अभाव आहे. वीजेच्या बाबतीत पुनर्वसनात समस्या उद्भवल्या आहेत.मौदी पुनर्वसनात एकुण ७४ वीज ग्राहक असून मागील वर्षभरापासून एकही वीजधारकाने विद्युत बिल भरलेले नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पुनर्वसनातील वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चमू पुनर्वसनस्थळी पोहचली. विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळेच वीज पुरवठा खंडीत केल्याची माहिती पहेला वीज वितरण उपकेंद्राचे सहायक अभियंता एस. के. गजभिये यांनी दिली. सकाळी ११ वाजतापासून अन्य मागण्यांसाठी ग्रामस्थांनी विद्युत रोहित्राजवळच विद्युत अधिकारी व कर्मचाºयांना घेराव घातला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्रामवासीयांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चु कडू यांनी, जेव्हापर्यंत पुनर्वसन क्षेत्रातील ग्रामस्थांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी आहोत, असे म्हटले आहे.आश्वासन नको रोजगार द्याशासनाने नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुनर्वसन क्षेत्रातील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली होती. याच विषयाला घेवून ग्रामवासीयांनी बुधवारी एल्गार पुकारला. रोजगार उपलब्ध करुन देणार नाही. तोपर्यंत कुठलाही शासकीय कर किंवा देयकाचा भरणा करणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच आगामी निवडणुकीतही मतदानावर बहिष्कार घालण्याचा ठाम निर्धारही ग्रामवासीयांनी यावेळी व्यक्त केला.