शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना घेऊन जावे लागते कडेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:57 IST

समाजाचा घटक असलेल्या दिव्यांग बांधवांनाही सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी जीवाचे रान केले जाते, मात्र राजकीय उदासीनता व निधीचा वाणवा या प्रमुख बाबींमुळे दिव्यांगांची फरफट आजही सुरूच आहे.

ठळक मुद्देआज जागतिक अपंग दिन : फिजिओथेरॅपी कक्ष कुलूपबंद

इंद्रपाल कटकवार।आॅनलाईन लोकमतभंडारा : समाजाचा घटक असलेल्या दिव्यांग बांधवांनाही सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी जीवाचे रान केले जाते, मात्र राजकीय उदासीनता व निधीचा वाणवा या प्रमुख बाबींमुळे दिव्यांगांची फरफट आजही सुरूच आहे. भंडारा शहरातील दिव्यांगांसाठी असलेल्या फिजीओथेरॅपी सुविधांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दिव्यांगांना या कक्षात नेण्यासाठी रस्ता नसल्याने कडेवरच उचलून जावे लागते. यात दिव्यांगांसह नातेवाईकांचीही प्रचंड फरफट होत आहे.रविवारी 'जागतिक अपंग दिन' साजरा होत असताना दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याकडे खरचं शासन प्रशासन गंभीर आहे काय, यावर चिंतन करणे गरजेचे झाले आहे.मानसीकदृष्ट्या कमकुवत, शारीरिक व्याधी यासह अन्य दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया योजनेअंतर्गत फिजीओथेरॅपी सुविधा देण्यात येते. ही सुविधा भंडारा शहरातील जकातदार कन्या शाळा परिसरात असलेल्या नवोदय विद्यालयाच्या ईमारतीला लागू आहे. विशेष म्हणजे या फिजीओथेरॅपी कक्षाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने दिव्यांगांना चक्क कडेवर उचलून घेवून जावे लागते.कक्षाकडे जाणाºया भागात नवोदय विद्यालयाची सुरक्षा भिंत आहे. त्यामुळे अपंगत्व असलेल्या बालकांना स्वत:ची तीन चाकी (ट्री सायकल) कक्षापर्यंत नेता येत नाही. पालकांनासुद्धा व्यवस्थीत कक्षापर्यंत जाता येत नाही. सन २०१०-११ मध्ये जे.के. शाळेच्या परिसरात विशेष गरजा असलेल्या बालकांच्या आरोग्यात्मक विकासाकरिता नवीन ईमारत तयार करण्यात आली. परंतु दिव्यांग बालकांच्या अधिकाराबाबत दुर्लक्ष करीत असलेल्या शिक्षण विभागाने त्यामध्ये दस्ताऐवज ठेवले आहे. सध्यस्थितीत ही ईमारत कुलूपबंद आहे. दिव्यांग बालकांकरिता बांधण्यात आलेल्या ईमारतीमध्ये पूर्ण सोयी सुविधा अद्ययावत करून दिल्यास दिव्यांगांना कक्षाचा लाभ घेता येईल.६०० ऐवजी चार हजार रूपये मानधन द्यासंजय गांधी निराधार योजनेमधील बांधवांना ६०० रूपये प्रती महिना मानधन दिले जाते. अपंगांना चार हजार रूपये प्रमाणे मानधन द्यावे, अशी मागणी दिव्यांग बांधवांनी व पालकांनी केली आहे. तसेच वार्षिक उत्पन्न दाखल्याची मर्यादा २१ हजार रूपयावरून ५० हजार रूपये ठेवण्यात यावी, अशी मागणी आहे. यासंदर्भात मार्च २०१५ मध्ये राज्य शासनाच्या संबंधित विभागांतर्गत चर्चा झाली होती. यात आमदार बच्चू कडू यांनी सहभाग नोंदविला होता. अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यावरही तीन टक्के निधी खर्च करावा, रिक्त पदे भरावी ही मुळ प्रश्ने सुटली नाहीच तर दुसरीकडे मानधनाचा मुद्दाही प्रलंबित आहे.