शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अंगणवाडी सेविका राबतात तुटपुंज्या मानधनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:20 IST

लहान मुलांचे बौद्धिक आणि शारीरिक पोषण करण्यासाठी धडपडणाऱ्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका मात्र तुटपुंज्या मानधनावर राबत आहेत.

ठळक मुद्देकोंडी सुटेनान्याय्य मागण्यांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लहान मुलांचे बौद्धिक आणि शारीरिक पोषण करण्यासाठी धडपडणाऱ्या राज्यभरातील अंगणवाडी सेविका मात्र तुटपुंज्या मानधनावर राबत आहेत. गत अनेक वर्षात त्यांच्या मानधनात शासनाने कोणतीच भरीव वाढ केली नाही. परिणामी राज्यातील 2 लाख ८० हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलनाचे हत्यारही उपसले. पंरतु नेहमी आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. राज्य सरकारने अंगणवाड्यांचे खासगीकरण करू नये, सेविकांना पंधरा दिवस आजारी रजा मिळावी, उन्हाळी सुटी एकाच वेळी एक महिना सेविका व मदतनीसांना उपभोगता यावी आणि मानधन नको वेतन हवे, अशा विविध मागण्या आहेत. राज्यात अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत चालवल्या जातात. राज्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, स्वयंपाकगृहांचा अभाव अशा गंभीर समस्या आहेत.

अन्य राज्यांच्या तुलनेत मानधन अपुरेअन्य राज्याच्या तुलनेत मानधन देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य पिछाडीवर आहेत. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश छत्तीसगढ व अन्य राज्यात अंगणवाडी सेविकांना पुरेसे मानधन दिले जाते. मात्र राज्यात अगदी तुटपुंजे मानधन दिले जाते. त्यातून त्यांच्या कुटुंबांचा घरखर्चही भागवणे कठीण जाते. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात या कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून वेतन दिले जात आहे. प्रगत राज्य म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाराष्ट्रत ही बाब लाजीरवाणी आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्यांना वेतन श्रेणीचा लाभ देणे गरजेचे आहे. वेतन श्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय होईपर्यंत अंगणवाडी सेविकेला १८ हजार रूपये व मदतनीसला १५ हजार रूपये मानधन द्यावे, ही आमची मुख्य मागणी आहे.-हिवराज उके,कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी युनियन, भंडारा.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र