व्यथा सिहोरा परिसरातील गावांची : जंगलव्याप्त गावात मूलभूत सोयींचा अभावरंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा)सातपुडा पर्वत रांगाच्या घनदाट जंगलात वास्तव्यास असलेल्या सिहोरा परिसराीतल गावात मुलभूत सोयींचा अभाव आहे. खैरटोला या गावात तर ना अंगणवाडी आहे ना शाळा. सिहोरा परिसरात निम्याहून अधिक जमीन घनदाट जंगलांनी व्यापलेली आहे. या जंगलाचा विस्तार रामटेकपर्यंत आहे. जंगलात हिंस्त्र वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार आहे. या जंगलात रेवाबाईचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मार्गावरील घनदाट जंगलात गुढरी, खैरटोला, खंदाड, सोदेपूर, धामनेवाडा ही गावे आहेत. या गावांचा प्रशासकीय कारभार गुढरी येथील गटग्रामपंचायतीत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सौर ऊर्जेवरील नळयोजना सुरु आहे. २०-२५ घरे असलेल्या खैरटोला या गावात अद्याप शाळा आणि अंगणवाडी बांधण्यात आली नाही. दीड कि.मी. अंतरावरील खंदाड गावात बालक आणि विद्यार्थ्यांना नेले जातात. या चिमुकल्यांचा पायदळ प्रवास सुरू आहे. वास्तव्याला असलेले नागरिक मोलमजुरी करतात. विद्यार्थी असणाऱ्या सक्करधरा गावात शाळा आहे. परंतु या गावात शौचालयाचे महत्व सांगणारी यंत्रणा नाही. गावात ज्यांचे शासकीय घरकुल बांधकाम झाले आहेत. अशा लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. शौचालयाचा उपयोग शून्य आहे. रात्री घराबाहेर पडताना नागरिकांत भीती असते. रात्र होताच वन्यप्राणी गावांचा आश्रय घेतात. या गावात घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. खुल्या आकाशात वास्तव्य करण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. अनेकांनी घरे, लाकडी ओंडके यांची जुळवाजुळव करून बांधकाम केले आहे. या घरात वादळवारा शिरत आहे. परंतु, गरिबी त्यांच्या विकासात आड येत आहे. शासनाने घरकुल योजना गरजु असतानाही प्राप्त होत नाही. वडिलांना घरकुल मिळाल्यास अपत्यांना बिपीएल क्रमांकावर मिळत नाही. शासनाच्या कल्याणकारी योजना जंगलव्याप्त गावात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या दारात पोहचलेल्या नाहीत. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसे प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु अंतिम मंजुरी मिळत नाही. या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायतला विशेष निधीची गरज आहे. गावात सार्वजनिक दिवाबत्तीची सोय करण्याची गरज आहे.
‘खैरटोला’त ना अंगणवाडी ना शाळा
By admin | Updated: December 16, 2014 22:45 IST