शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 14:33 IST

Bhandara : अनेक अंगणवाडीचे जागेअभावी व निधीअभावी इमारत बांधकाम झालेले नाहीत. अश्या परिस्थितीत जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय?

भंडारा : ग्रामीण भागांमध्ये अंगण परिसरात चालवली जाणारी माहिती केंद्र म्हणजे अंगणवाडी. या अंगणवाडीतून बालकांचे कुपोषण संपूर्णतः नष्ट करावे हेच मुख्य उद्दिष्ट; मात्र हे उद्दिष्ट ज्या अंगणवाडीमधून पूर्ण करायचे आहेत, त्याच अंगणवाडींची अवस्था बिकट आहेत. अनेक अंगणवाडीचे जागेअभावी व निधीअभावी इमारत बांधकाम झालेले नाहीत. अश्या परिस्थितीत जिल्ह्यातील अंगणवाडी डिजिटल होणार काय?

अंगणवाडीचा अर्थ काय?अंगणवाडी शब्दाचा अर्थ 'अंगणामधील निवारा' असा आहे. अंगणवाड्या भारत सरकारने १९७५ साली एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या. त्याचा उद्देश बालकांमधील कुपोषणाशी लढणे हा होता; मात्र सद्यस्थितीत या अंगणवाड्यांचा विकास बराच मागे पडला आहे.

१८७ इमारती निर्लेखनात ग्रामीण भागातील १८७ इमारती निर्लेखनात आहेत म्हणजेच नादुरुस्त आहेत. त्यापैकी ५० अंगणवाडी केंद्राला मंजुरी मिळाली आहे. मिनी अंगणवाडी केंद्र १०९ पैकी १०० अंगणवाडी केंद्र भाड्याचे आहेत. त्यांना स्वतःची इमारत नाही.

अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या सेविका व मदतनिसांच्या समस्या जशा कायम आहेत तशाच अंगणवाडींचीही समस्या सुटलेली नाहीत. परिणामी अंगणवाडीत शिकणारी बालके ही त्यांच्या हक्कापासून दुरावली जात आहेत. या अंगणवाडीमधून पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण व आरोग्य व आहार शिक्षण अशी कार्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांना करावी लागते. कारण स्थानिक अंगणवाडी ही आईसीडीएसचा आधारशिला आहे. खरं तर आईसीडीएस सेवा त्याच्या केंद्रांच्या विशाल नेटवर्कद्वारे पुरवल्या जातात. त्याला 'अंगणवाडी' म्हणतात. नावाप्रमाणेच अंगणवाडी हे एक केंद्र आहे. अंगणवाडी केंद्रसेविका चालवतात आणि मदतनीस त्यांना मदत करतात. 

अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे लोकसंख्येच्या निकषांवर आधारित आहेत. यात महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे आहे. तसेच माता-बालक यांच्या आरोग्य, आहार, कुपोषण या अन्य बाबींकडे लक्ष पुरवणे आदी कार्यांचा समावेश अंगणवाडी बालकांमध्ये होतो. याशिवाय पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील महिलांना आहार व आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन करणे हे देखील अंगणवाडीचे मूलभूत कार्य आहे. एवढी कामे या अंगणवाडीतून होत असताना त्यांच्या आधुनिकीकरणाकडे म्हणजेच डिजिटायझेशनकडे वाटचाल होतांना दिसून येत आहे. 

भंडारा जिल्ह्यात अंगणवाडींची संख्या १३०५ इतकी आहे. यात मिनी अंगणवाडी २०९ आहेत. मोठ्या अंगणवाडीमध्ये एक अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतीला एक मदतनीस असते तर मिनी अंगणवाडीमध्ये फक्त सेविका असतात. मानधन वाढीसह विविध न्याय मागण्यांकरिता राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आंदोलन केले होते. शासनाने त्यांना आश्वासनही दिले मात्र अंगणवाडींच्या अवस्थेकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. ग्राउंड लेव्हलवर झुंजणाऱ्या या सेविका व मदतनीस जिथे काम करतात, तिथे सुविधांचा बोजवारा उडाला आहे, हीच खरी शोकांतिका आहे.

भंडारा जिल्ह्यात १३०५ मोठे अंगणवाडी केंद्र तर १०९ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. कार्यरत मदतनिसांची संख्या १०८५ आहेत. शहरी प्रकल्प १६५ अंगणवाडी केंद्र आहेत. यात अंगणवाडीच्या स्वतःच्या मालकीच्या इमारती ८१ असून ८४ अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. जागेअभावी व निधीअभावी इमारत बांधकाम नाही.- दिलीप उटाणे, कार्याध्यक्ष, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन कार्यक्रम म्हणूनही ओळखला जातो.

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीbhandara-acभंडारा