शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अन् रूपालीने पळवून लावला वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:03 IST

मध्यरात्रीची वेळ. घराबाहेर बांधलेल्या शेळीने जोराचा हंबरडा फोडला. आवाज कशाचा आहे, नेमके काय झाले, हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणीने दार उघडला. तिला कुठेही काहीच दिसले नाही. परंतु शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिला दिसली. त्यानंतर ती वळत असताना तिला कुणाची तरी सावली दिसली. त्या तरूणीने पुन्हा दाराकडे वळून बघितले असता समोर साक्षात जंगलाचा राजा ऐटीत उभा होता. क्षणाचाही विलंब न करता वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. दोघांच्या झुंजीत शेवटी तिचा विजय झाला.

ठळक मुद्देऊसगाव येथील घटना : आर्थिक मदतीपासून मेश्राम कुटुंबीय वंचित

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मध्यरात्रीची वेळ. घराबाहेर बांधलेल्या शेळीने जोराचा हंबरडा फोडला. आवाज कशाचा आहे, नेमके काय झाले, हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणीने दार उघडला. तिला कुठेही काहीच दिसले नाही. परंतु शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिला दिसली. त्यानंतर ती वळत असताना तिला कुणाची तरी सावली दिसली. त्या तरूणीने पुन्हा दाराकडे वळून बघितले असता समोर साक्षात जंगलाचा राजा ऐटीत उभा होता. क्षणाचाही विलंब न करता वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. दोघांच्या झुंजीत शेवटी तिचा विजय झाला.ही कुण्या चित्रपटातील ‘कथा’ नव्हे तर एका तरूणीने हिंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे.या हल्ल्यात रूपाली व तिची आई जखमी झाली. जिजाबाई सुखरूप असून रूपालीवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. २४ मार्चच्या मध्यरात्री हा घडलेला थरारक प्रकार रूपाली आजही निर्र्भयतेने सांगते. वाघाने हल्ला केल्याने रूपालीच्या डोक्याला, कमरेला व दोन्ही हातपायांना जबर दुखापत झाली आहे. रक्त वाहू लागल्यामुळे काय करावे, हे तिला सुचेना. परंतु लढण्याची हिंमत होती.वाघ दिसताच भल्लाभल्याची दातखिळी बसते. परंतु रूपाली विचलीत झाली नाही. वाघाला प्रत्युत्तर देत असताना आई जिजाबाईनेही वाघावर काठीने प्रहार केला. यात वाघाने जिजाबाईवरही हल्ला केला. हिंंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावायचचं, असा चंग बांधून रूपालीने वाघावर पुन्हा प्रहार केला. त्यानंतर वाघाने तिथून धूम ठोकली. घरे दूरवर असल्यामुळे आरडाओरड केल्याचा आवाजही शेजाऱ्यांना पोहोचला नाही. वाघाने पळ काढल्यानंतर दरवाजा बंद केला. रक्ताच्या थारोळ्यात असताना शेजाऱ्याला भ्रमणध्वनीवर याची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्याची मदत मिळाली. दोघानांही साकोली उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले. रूपालीला गंभीर दुखापत असल्याने तिला नागपूर येथील मेडिकल कॉलेजला ‘रेफर’ करण्यात आले. या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी वनविभागातर्फे या मायलेकींना कुठलिही आर्थिक मदत मिळालेली नाही. हातात जेवढी रक्कम होती तीही आता खर्च झाली आहे. औषधोपचाराला पैसा लागत नसला तरी अन्य खर्च पूर्ण करण्यासाठी सोने-चांदीचे दागिणेही त्यांनी विकले. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या रूपालीला या घटनेने लढण्याचे बळ मिळाले असले तरी आर्थिक मदतीपासून हे कुटुंब वंचित आहे.