लुंबीनी मतिमंद शाळेला भेट : विद्यार्थ्यांची शिस्तबध्दतेचे केले कौतुकतुमसर : आयुष्य हे सुंदर आहे. ते हसत-खेळत जगल्यास जीवनात येणारे संकट लीलया पार करता येते. मिळालेले आयुष्य त्या परिस्थितीत जगणे हेच आयुष्याचे मुलमंत्र आहे. मतीमंद आयुष्य जगण्याला आले तर ते आयुष्य कसे जगावे, असा प्रश्न नक्कीच मन सुन्न करते. याची प्रचिती उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांना आली. शहरातील लुंबिनी मतिमंद विद्यालयात त्यांनी भेट दिली असता त्यांचे मन गहीवरले. सुमारे दोन तास त्यांनी येथील विद्यार्थ्यांसोबत घालविल्यावर आयुष्यात प्रथमच त्यांनी मतिमंदाचे आयुष्य कसे असते याची प्रतिची आली.तुमसर येथे दुर्गा नगरात लुंबिनी मतिमंद मुलांची निवासी शाळा मागील ८ ते १० वर्षापासून सुरु आहे. या शाळेचे संचालक नयन भूतांगे आहेत. शासकिय अनुदानास ती आता पात्र ठरली आहे. एका कार्यक्रमानिमित्त शिल्पा सोनुले यांना शाळेने निमंत्रण दिले. कामाचा व्याप असतानाही त्यांनी या शाळेत दोन तास घालविले. प्रत्येक विद्यार्थ्यांची त्यांनी आस्थेने माहिती जाणून घेतली.विद्यार्थ्यांनीही त्यांच्यातील कलागुणांनी अधिकाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. अतिशय शिस्तप्रिय हे विद्यार्थी पाहून त्या भारावून गेल्या. शाळेतील मूलभूत सोयी अनुदानीत शाळेत नाहीत त्या सोयी येथे आहेत. पाणी जलशुध्दीकरण यंत्र, गरम पाण्याचे संयत्र व परिसरातील नागरिकांचे प्रेम पाहून आजही माणूसकीचा झरा ओसंडून वाहतो, असे त्यांना येथे जाणवले. याप्रसंगी शाळा संचालक तथा शिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले. या शिक्षकी पेशात काम करणे खरे आव्हान असून मतिमंदाची सेवा ही ईश्वरसेवा आहे असे, उद्गार उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी काढले. (तालुका प्रतिनिधी)
अन् उपविभागीय अधिकारी गहिवरल्या
By admin | Updated: September 5, 2015 00:39 IST