शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अन् अधिकाऱ्यांची धावपळ सुरु

By admin | Updated: April 11, 2017 00:41 IST

कारधा - खमारी, कारधा - दवडीपार या मार्गावरील वृक्षांची विना परवानगी तोड करण्यात आली.

प्रकरण वृक्षतोडीचे : अधिकाऱ्यांची नागपुरवारीभंडारा : कारधा - खमारी, कारधा - दवडीपार या मार्गावरील वृक्षांची विना परवानगी तोड करण्यात आली. यात शासकीय नियम बाजूला ठेवून हा सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने केल्याची बाब ‘लोकमत’ने लावून धरली आहे. आज ‘त्या वृक्षकटाईच्या चौकशीचे आदेश धडकले’. या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. कार्यकारी अभियंता यांना तातडीने नागपुरला बोलाविण्यात आले. रहदारीला वृक्षांचा अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता पी.पी. ठमके यांनी कारधा - खमारी, कारधा - दवडीपार या मार्गावरील प्रत्येकी सुमारे २ कि.मी. अंतरावरील वृक्षांची कत्तल केली. ही सर्व नियमबाह्य करण्यात आली आहे. वृक्षकटाई करण्यासाठी वनविभागाची परवानगी घेतली नसल्याची बाब आता वनविभागानेही व्यक्त केली आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी वनमंत्री व बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणी मुख्य अभियंता यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. वृक्षकटाईच्या चौकशीचे आदेश या आशयाचे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्तामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वृत्त प्रकाशनाने नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भंडारा सार्वनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल येरकड यांना तातडीने नागपुरला बोलाविण्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)निविदा न काढताच वृक्ष कटाईसार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगतच्या वृक्षांची कटाई केली. तत्पूर्वी त्यांनी वृक्षांचे सीमांकन करून त्या संबंधात निविदा प्रकाशित करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता मर्जीतील ठेकेदाराला वृक्षकटाईचे परस्पर आदेश दिल्याचीही गंभीर बाब आता समोर आली आहे. शासकीय मालमत्तेचे या अधिकाऱ्यांनी नुकसान केले आहे. बांधकाम विभागाने निविदा मागवून सहभागी कंत्राटदारांकडून वृक्षकटाईचे दरपत्रक घेणे गरजेचे होते. मात्र या सर्व बाबीला टाळून वृक्षकटाई करण्यात आल्याची गंभीर बाब आता उघडकीस आली आहे.