शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अन् नगरपरिषदने मिळवून दिला स्वयंरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:23 IST

स्वयंरोजगाराबद्दल केवळ भाषणापुरते धन्यता न मानता प्रत्यक्ष कृतीत उतरवून नगराध्यक्ष प्रदीप पडोळेनी शहरातील बीपीएल धारकांना आॅटो रिक्शाचा लाभ देवून स्वयंरोजगार मिळवून दिला आहे.

ठळक मुद्देप्रदीप पडोळे यांचा पुढाकार : सहा बीपीएलधारकांना आॅटोरिक्षाचा लाभ

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : स्वयंरोजगाराबद्दल केवळ भाषणापुरते धन्यता न मानता प्रत्यक्ष कृतीत उतरवून नगराध्यक्ष प्रदीप पडोळेनी शहरातील बीपीएल धारकांना आॅटो रिक्शाचा लाभ देवून स्वयंरोजगार मिळवून दिला आहे.साधारणत: मागील दोन अडीच दशकात तुमसर शहर व तालुक्यातील छोटे मोठे उद्योग बंद पडले आहे. परिणामी रोजगाराच्या मोठ्या संधी शहरातून गेल्या. नवीन एकही उद्योग शहरात आला नाही. त्यामुळे रोजगार तसेच व्यापाऱ्यावर विपरित परिणाम दिसून आल्याने एकेकाळी कुबेराची नगरी म्हणून नावारुपास आलेल्या तुमसर शहराला ग्रहणच लागले आहे. खितपत पडलेल्या दारिद्र्य रेषेखालील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पुढाकार घेतला. न.प. च्या माध्यमातून कौशल्य विकासाचे धडे गिरवत शहरातील अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. काहींना ते शिक्षणासाठी पुढकारानेही स्वखर्चातून आर्थिक मदतही करीत आहेत. परंतु त्याने साध्य होणार नाही. ही भावना मनात बाळगून नागरिकांना वमहिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करून बँकांच्या माध्यमातून कर्ज अनेकांना मिळवून दिले. स्वयंरोजगारातून रोजगाराची प्राप्ती व्हावी, यासाठी पडोळे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील येत असलेल्या शहरातील भोलेनाथ मानवटकर, रविकांत भोगे, खेमराज भोंगाडे,नामदेव धारंगे, महेश साठवणे, हिफजुल कुरैशी या लाभार्थ्याला नवीन आॅटो रिक्शा उपलब्ध करवून देवून त्यांना स्वयंरोजगार मिळवून दिला आहे. सहाही लाभार्थ्यांना एकाच वेळी न.प. च्या प्रांगणात आॅटो रिक्शा वितरित करण्यात आले. त्यावेळी सभापती तारा गभणे, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, नगरसेवक श्याम धुर्वे, रजनिश लांजेवार, सलाम तुरक, किशोर भवसागर, राजू गायधने, गीता कोंडेवार, शिला डोये व न.प. कर्मचाऱ्यांसह असंख्य नगरवासी हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.शासनाच्या योजनेचा लाभ तळागाळातील लोकापर्यंत पोहचवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच मानस आहे.-प्रदीप पडोळेनगराध्यक्ष, तुमसर