लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : अन्न व निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. समाजातील प्रत्येक स्थरावरच्या लोकांना न्याय मिळून त्यांच्या अन्न वस्त्र व निवाºयाची गरज हक्काने मिळाली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन दलित शोषित समाजाला नवीन जन्म दिला. त्यांच्या या कार्याची जाणीव ठेवून धम्मकचक्र परिवर्तन दिवसाच्या निमित्ताने आयोजित अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा राईस मिल ओसिएशनचे अध्यक्ष व उद्योगपती राजू कारेमोरे यांनी केले.चालक मालक आॅटो रिक्षा संघ व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने वरठी येथील रेल्वे फाटकाजवळ अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.उद्घाटन राजू कारेमोरे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संजय मिरासे, श्वेता येळणे, शुभांगी गणवीर, सीमा डोंगरे, रितेश वासनिक, पवन रामटेके, संघदीप उके, विवेक बौद्ध, राजेश वासनिक, हितेंद्र नागदेवे, प्रमोद वासनिक, महेश बर्वेकर, रमेश रामटेके, दमयंता वासनिक, अहिल्याबाई वासनिक व चालक मालक आॅटो संघाचे प्रशांत रामटेके, प्रबोध बोरकर, बाबा डोंगरे उपस्थित होते.यावेळी जवळपास १५०० लोकांना अन्नदान करण्यात आले.संचालन व आभार हितेंद्र नागदेवे यांनी मानले.
अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:23 IST
अन्न व निवारा या माणसाच्या मूलभूत गरज आहेत. समाजातील प्रत्येक स्थरावरच्या लोकांना न्याय मिळून त्यांच्या अन्न वस्त्र व निवाºयाची गरज हक्काने मिळाली पाहिजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले.
अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे
ठळक मुद्देराजू कारेमोरे यांचे प्रतिपादन : चालक मालक आॅटो रिक्षा संघ व सामाजिक कार्यकर्त्यांचा उपक्रम