शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका चालकांचा संघर्ष थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:42 IST

रुग्णांच्या सेवेसाठी रात्री बेरात्री धावून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकांच्या जीवनातील संघर्ष संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. आरोग्य विभागात कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या जिल्हाभरातील ४५ रुग्णवाहिका चालक अल्पशा मानधनावर कार्यरत असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागातील प्रकार : अल्प मानधनावर ओढतात संसाराचा गाडा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रुग्णांच्या सेवेसाठी रात्री बेरात्री धावून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकांच्या जीवनातील संघर्ष संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत. आरोग्य विभागात कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या जिल्हाभरातील ४५ रुग्णवाहिका चालक अल्पशा मानधनावर कार्यरत असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.आरोग्य विभागांतर्गत जिल्हाभरातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयातील जवळपास ४५ रुग्णवाहिका चालक आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात कार्यरत या वाहन चालकांच्या समस्या मागील दशकभरापासून जैसे थे आहेत. विद्यमान स्थितीत या रुग्णवाहिका चालकांना प्रतीमाह ८ हजार ८०४ रुपये मानधन दिले जाते. मात्र शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे या रुग्णवाहिका चालकांना १४ हजार ९०० रुपयांचे मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र या मागणीला खो देण्यात येत आहे.दरम्यान या रुग्णवाहिका चालकांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आता या रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशा आहेत प्रमुख समस्यावाहनचालक अजूनही कंत्राटी पद्धतीवर कार्य करीत आहेत. अन्य राज्यातील रुग्णवाहिका चालकांना चांगले मानधन मिळत असताना राज्यातील विशेषत: पूर्व विदर्भातील रुग्ण वाहिका चालकांचे मानधन अत्यल्प आहे. अशा स्थितीत प्रपंच चालविणे जिकरीचे झाले आहे. परिणामी राज्य स्तरावरील बाह्यस्त्रोत वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट बंद करून ठेकेदारी पद्धती बंद करावी, मंजूर पदांतर्गत विनाअट व शर्तीने वाहनचालकांचे समायोजन करावे, दरमहा १५ हजार रुपये मानधन देऊन शासकीय निवासाची व्यवस्था करून देण्यात यावी आदी प्रमुख मागण्या आहेत.