शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

रुग्णवाहिका चालकाने केले तीन हजार वसूल

By admin | Updated: June 16, 2014 23:19 IST

एका दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील चिमुकल्या मुलीला तुमसरवरून नागपूर येथे उपचारासाठी नेण्याकरिता रुग्णवाहिकेच्या चालकाने १,२०० रुपये घेतले. मेडिकलच्या पायरीवर त्या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

तुमसर: एका दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील चिमुकल्या मुलीला तुमसरवरून नागपूर येथे उपचारासाठी नेण्याकरिता रुग्णवाहिकेच्या चालकाने १,२०० रुपये घेतले. मेडिकलच्या पायरीवर त्या मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेह घेऊन जाता येत नाही, असे कारण समोर केल्यानंतर त्या कुटुंबीयांनी चालकाला विनवणी केल्यानंतर तो तयार झाला. परंतु परतीच्या प्रवासाकरिता या चालकाने या कुटुंबाकडून १,८०० रुपये वसुल केले. तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील या कंत्राटी वाहन चालकाला निलंबित करण्याची मागणी मृत मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे.तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथील राजू धोटे यांची सात वर्षीय मुलगी प्रियंका हिची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तिला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी मुलीचे वडील राजू धोटे व मामा संजय रोडके यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाला केली. रुग्णवाहिकेचा चालक राकेश बिसने याने दोन हजार भाडे सांगितले. इतकी रक्कम देऊ शकत नाही, असे सांगितल्यावर चालक बिसने याने १,८००, १,५०० शेवटी १,२०० रुपयात घेऊन जाण्यासाठी तयार झाला. या रकमेची जुळवाजुळव करण्याकरिता प्रियंकाच्या मामाला दोनअडीच तास लागले. तुमसर येथील रुग्णालयातून रुग्णवाहिका निघाल्यावर नागपूरपर्यंत १०० कि.मी. च्या प्रवासाला साडे तीन तास लागले. मेडीकलच्या पायरीवर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिला मृत घोषित केले. रुग्णवाहिकेच्या चालकाला प्रियंकाचा मृतदेह तुमसरला आणायचे होते. त्यावेळी रुग्णवाहिकेचा चालक राकेश बिसने याने मृतदेह नेता येत नाही. दुसरी रुग्णवाहिका तुम्ही भाड्याने करा, असे सांगून टाळाटाळ केली. दुसऱ्या रुग्णवाहिकेसाठी अधिकचे पैसे लागणार असल्याचे सांगितल्यामुळे धोटे कुटुंबिय हतबल झाले. दरम्यान तुमसर येथील रुग्णवाहिका चालक रुग्णवाहिका घेऊन तेथेच उभा होता. त्यावेळी संजय रोडके व राजू धोटे यांनी रुग्णवाहिका चालक बिसने याला विनंती केली. त्यावेळी राकेशने डॉक्टरशी बोलून सांगतो, असे म्हणून त्याने भ्रमणध्वनीवर संपर्क केला. २,५०० रुपये पुन्हा लागतील, असे सांगितले. आता माझ्याकडे १,८०० रुपये असून ते संपूर्ण पैसे घे, परंतु मृतदेह घेऊन चला, असे म्हटल्यावर तो १८०० रुपयात तयार झाला. परंतु या रकमेची कोणतीही पावती रुग्णवाहिका चालकाने दिली नाही. या प्रकरणाची तक्रार मृतक मुलीच्या कुटुंबाने जिल्हा शल्यचिकित्सकांना केली असली तरी अजूनपर्यंत चौकशी झाली नाही. तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका चालक बीव्हीजी इंडिया लिमिटेड चिंचवड या कंपनीचे कंत्राटी कर्मचारी आहेत. आरोग्य विभागाने खासगी कंपनीला हे कंत्राट दिले असल्यामुळे येथे मनमानी कारभार सुरु आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाचा त्यांच्यावर अंकुश नाही. (तालुका प्रतिनिधी)