शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेचे कंत्राटी वाहनचालक वेतनाविना

By admin | Updated: December 25, 2014 23:28 IST

आरोग्य सेवेचा एक भाग असलेला रुग्णवाहिका सेवेच्या वाहनचालकांना मागील पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट बळावले असून उपासमारीची वेळ आली आहे.

भंडारा : आरोग्य सेवेचा एक भाग असलेला रुग्णवाहिका सेवेच्या वाहनचालकांना मागील पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. परिणामी त्यांच्यावर आर्थिक संकट बळावले असून उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात आरोग्य मंत्र्यांना भेटूनही समस्या मार्गी निघालेली नाही. वेतन न मिळाल्याने दि. ५ जानेवारीपासून रुग्णवाहिका सेवा बंद करण्याचा इशारा जिल्हा कंत्राटी वाहन चालक असोशिएनचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी दिला आहे. प्रत्येक जिल्हयात ४० ते ५० रुग्णवाहिका वाहन चालक आहेत. भंडारा जिल्हयात वाहन चालकांची संख्या ६० च्या जवळपास आहे. २४ तास अल्पशा वेतनावर हे वाहन चालक कार्य करीत आहेत. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत रुग्णालयाच्या निवड समितीमार्फत ६ हजार रुपये प्रति माह वेतनावर कंत्राटी वाहन चालकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शासनस्तरावर सन २०१२ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात, व एका खाजगी कंपनीला प्रति वाहन चालक १४,७७५ रुपये याप्रमाणे देण्याचे काम देण्यात आले होते. पंरतु ती कंपनी केवळ ६ हजार रुपये देत होती.केंद्रातील एनपीसीसी समितीने ते कंत्राटी वाहनचालक नामंजूर करुन रुग्णकल्याण समितीमार्फत ८ हजार प्रतिमाह वेतन देण्याचे ठरविले होते. त्या वाहनचालकांच्या नियुक्त्या १ आॅगस्ट २०१४ मध्ये करण्यात आल्या आहेत. पंरतु प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर स्थगिती देण्यात आल्याने वाहन चालकांचे वेतन अजूनपर्यंत मिळालेले नाही. यासंदर्भात अधिवेशना दरम्यान मोर्चा काढून आरोग्य मंत्र्याचे लक्ष वेधण्यात आले. त्यांना निवेदनही देण्यात आले. त्यात नमूद केल्याप्रमाणे कंत्राटी रुग्णवाहीका वाहन चालकांना १५ हजार रुपये वेतन दयावे, कंत्राटी पध्दत बंद करावे, थकित वेतन देण्यात यावे, वाहन चालकांना स्थायी नोकरीत सामावून घेण्यात यावे, १५ टक्के घरभाडे व वेतन श्रेणी लागु करण्यात यावी, कार्यरत असलेल्या वाहन चालकांना कामावरुन कमी करु नये, वाहन चालकांचे पद हे मंजूर पद नव्याने सरळ सेवा भरती मार्फत करु नये, दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. दिनांक १ जानेवारी पर्यंत कंत्राटी वाहन चालकांचे वेतन न झाल्यास दिनांक ५ जानेवारीपासून रुग्णवाहिका सेवा बंद करु असा खनखनीत इशाराही असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र डोंगरे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)