शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आंबागड येथे तलावाच्या पाळीला पडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

यासंबंधात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र विभागाचे दुर्लक्ष कायम असल्याने याकडे विभागाचे लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील जुना आंबागड येथील गावशिवाराजवळच मोठा प्राचीन तलाव आहे. या तलावात पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचनासाठी करतात. यापूर्वी तलावात फारसे पाणी येत नव्हते. मात्र बावनथडी प्रकल्प बनल्यापासून तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे.

ठळक मुद्देलोकवस्तीला धोका वाढला : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : मोहाडी तालुक्यातील रामपूर येथील जुना आंबागड तलाव जीर्ण झाल्याने तलावाच्या पाळीला मोठे भगदाड पडले असून तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.यासंबंधात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र विभागाचे दुर्लक्ष कायम असल्याने याकडे विभागाचे लक्ष नाही. तुमसर तालुक्यातील जुना आंबागड येथील गावशिवाराजवळच मोठा प्राचीन तलाव आहे. या तलावात पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचनासाठी करतात. यापूर्वी तलावात फारसे पाणी येत नव्हते. मात्र बावनथडी प्रकल्प बनल्यापासून तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. त्यामुळे सदैव पाण्याने काठोकाठ भरलेल्या या तलावाला धोका निर्माण झाला आहे. तलावाची पाळही जीर्ण झाल्याने याला अनेक ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. ठिकठिकाणी या भेगांमधून पाणी वाहत असल्याने पाण्याचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या संबंधीची गावकऱ्यांनी अनेकदा पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करून तक्रार केली. मात्र सदर तलाव आमच्याकडे येत नसल्याची उडवाउडवीची उत्तरे देत कर्मचाºयांनी दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली. यानंतर गावकºयांनी स्वखर्चाने पाळीवर मुरुम घालून बुजविण्याचा प्रयत्न केला. पण गावातीलच एका तक्रारीनंतर हे काम अर्धवट राहिले. आजही या तलावातून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सुरु असल्याने तलावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. तलावातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने व तलावाला मोठे भगदाड पडल्याने तलावाच्या खालच्या भागातून आदिवासी बहुल ४८ कुटुंबाच्या लोकवस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. येथे अनेक शेतकरी धानपिकाची लागवड करतात. त्यामुळे तलावाची पाळ फुटल्यास मानवी जीवीतहानीसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष देऊन तलावाच्या दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र इळपाचे यांच्यासह गावकºयांनी प्रशासनाकडे केली आहे. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प