तुमसर तालुक्यातील डाेंगरीबूज येथील समाजमंदिरात राष्ट्रवादी काॅंंग्रेस आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. त्यावेळी ते बाेलत हाेते. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू कारेमाेरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, विठ्ठल कहालकर उपस्थित हाेते. यावेळी बाेलताना खासदार पटेल म्हणाले, डाेंगरीबूजरूक परिसराच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. बावनथडी प्रकल्पासारखी अनेक प्रकल्पांची प्रलंबित कामे आम्ही पूर्ण केली. रब्बी हंगामातील धान खरेदीला मुदतवाढ मिळवून दिली. राष्ट्रवादी काॅंंग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला सरिता मदनकर, पमा ठाकूर, सराेज भुरे, मंजूषा ठवकर, जयश्री गभणे, कविता साखरवाडे, विद्या कोकेडे, उमा साखरवाडे, शुभांगी रहांगडाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. या कार्यक्रमात वंदना आकरे यांनी राष्ट्रवादी काॅंंग्रेसमध्ये प्रवेश घेतला.