बॉक्स
आषाढी वारीसाठी अनेक वर्षांपासून एसटीचे नियोजन
राज्यात आषाढी वारी हा मोठा उत्सव असल्याने अनेक वर्षांपासून एसटी महामंडळातर्फे वारकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष नियोजन केले जाते. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षीही वारी सोहळ्याला परवानगी दिली नसल्याने अनेक जिल्ह्यांतील एसटीच्या बसेस धावणार नाहीत. तसेच जिल्ह्यातून एकही पालखी पंढरपूरला जाणार नसल्याची माहिती आहे.
बॉक्स
जिल्ह्यातून अनेक जण जायचे पंढरपूरला दर्शनासाठी
आषाढी एकादशीनिमित्त राज्यातून हजारो दिंड्या, पालख्या पंढरपुरात दाखल होत असतात. जिल्ह्यातील भाविक पंढरपूर, आळंदी, देहूला दर्शनासाठी जातात. मात्र या वर्षी कोरोनामुळे वारी सोहळा रद्द केला असल्याने अनेक जण घरातूनच आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. लाडक्या विठ्ठलाचे दर्शन ऑनलाइन टीव्हीवरच घेऊ असे काहींनी सांगितले. पंढरपूरला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा समावेश असतो. जसजशी दिंडी पुढे मार्गक्रमण करते तसतशी या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचते. या प्रत्येक दिंडीचा दिनक्रम हा ठरलेला असतो. दररोज सकाळी काकड आरती, हरिपाठ, रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन असा कार्यक्रम सुरू असतो. दररोज वीस ते तीस किलोमीटरची पायपीट करून या दिंड्या पंढरपुरात रवाना होतात. पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागल्याने हे वारकरी कधीच थकत नाहीत.
बॉक्स
वारकऱ्यांचे मन काही केल्या रमेना...
आमची पंढरीची वारी ही दोन पिढ्यांची आहे. पूर्वी पंढरपूरला जाण्यास विशेष साधने नव्हती. तेव्हा माझे पती चालत पंढरपूरला जात होते. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी कधीच वारी चुकवली नाही. आता पंढरपूरला जाता येत नाही. मात्र गावाताच पांडुरंगाचे दर्शन घेत वारीचा अनुभव घेत आहे.
मनाबाई सोनवणे, महिला वारकरी
आम्ही रेल्वेने पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त जायचो. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोना संसर्गामुळे पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे आम्ही आमच्या गावातील परिसरातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊ.
कृष्णा आकरे, वारकरी